रसिकांनी घेतला काव्यसंध्येचा आस्वाद
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 26, 2024
- 346
सेंट झेवियर्स हायस्कूल आणि अ.भा.म.सा. परिषदेच्यावतीने आयोजन
नवी मुंबई : नेरुळ मधील सेंट झेवियर्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने वसंत पंचमी सरस्वती देवी प्रकट दिन, मराठी भाषा गौरव दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात ठाणे जिह्यातील अनेक ज्येष्ठ तसेच नवोदित मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी मराठी भाषेची महती आणि आयुष्याच्या विविध टप्प्यांवर मार्मिक भाष्य करणाऱ्या विषयांवर कवितांचे वाचन झाले.
या कवी समेंलनास अ.भा.म.सा. परिषदेचे संस्थापक नंदकिशोर जोशी, माजी महापौर सागर नाईक, डॉ. श्याम मोरे, वरिष्ठ पत्रकार मनोज जालनावाला, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी, माजी नगरसेवक शिल्पा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यात ठाणे जिह्यातील अनेक ज्येष्ठ तसेच नवोदित मान्यवर कवी सहभागी झाले होते. यावेळी मराठी भाषेची महती आणि आयुष्याच्या विविध टफ्फ्यांवर मार्मिक भाष्य करणाऱया कवितांचे वाचन झाले.
माजी महापौर सागर नाईक यांनी प्रत्येक ठिकाणी मराठी भाषेच्या वापराचा आग्रह झाला पाहिजे तसेच अशा प्रकारची कवी संमेलने आयोजित करण्याचे आश्वासन दिले. तर संस्थापक नंदकिशोर जोशी आणि पत्रकार मनोज जालनावाला यांनी प्रकर्षाने मराठी भाषेचे महत्त्व मांडले. प्राचार्य मनीषा आंधणसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवा पिढीने अंगिकारण्याची गरज व महिलांचे सक्षमीकरण यावर आपले विचार मांडले. यावेळी गायक अनिल दामूर्डे यांनी भावगीत आणि गझल सादर केली. एकूणच या कवी संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेविषयी जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपस्थित रसिकांनी या काव्यसंध्येचा आस्वाद घेतला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai