663 पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीतगुणवत्तापुर्ण
- by Aajchi Navi Mumbai
- May 29, 2026
- 14
पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य असल्याचा पालिकेचा दावा
नवी मुंबई ः गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबईतील अनेक विभागामध्ये गढूळ पाण्याची समस्या भेडसावत आहे याविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे महापौर सुजाता पाटील यांनी शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेऊन दूषित पाण्याचे मूळ कारण शोधून त्यावर त्वरित ट्रीटमेंट करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानुसार दि. 28 मे रोजी विशेष पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात आली. विशेष तपासणी मोहीमेत 663 पाणी नमुने तपासणी केले. हे पाणी मानकांनुसार योग्य असल्याचे आढळून आले आहे.
उन्हाळ्याची तीव्रता आणि संभाव्य कमी पावसाचा अंदाज पाहता, मोरबे धरणातील उपलब्ध पाणीसाठा नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेने सुरू केलेल्या नियोजित पाणीकपातीला नागरिकही सहकार्य करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही काही भागांतून गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि कीटकयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. पावसाळ्यापूर्वीच अशा समस्या निर्माण होणे गंभीर असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी ही बैठक बोलावली गेली होती. यावेळी दिघा ते बेलापूर अशा संपूर्ण नवी मुंबई कार्यक्षेत्रात प्रत्येक नोड आणि प्रभागात पाण्याचे नमुने घेऊन तातडीने चाचण्या करण्याचे निर्देश दिले. जलवाहिन्यांमध्ये कुठे बिघाड किंवा गळती आहे का, याचा शोध घेऊन तपासणी सुरू करण्यात आली आहे.
येत्या पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच दूषित पाण्याचे मूळ कारण शोधून त्यावर त्वरित ट्रीटमेंट करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
महापौर सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार दि. 28 मे रोजी विशेष पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम राबविण्यात आली. भोकरपाडा जल शुद्धीकरण केंद्र, बेलापूर ते दिघा विभाग तसेच मुख्य जलवाहिन्यांवरील विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करण्यात आली. भोकरपाडा जल शुद्धीकरण केंद्र येथे 72 पाणी नमुने, मुख्य जलवाहिनीवर 96 पाणी नमुने तसेच बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा विभागात 495 इतके पाणी नमुने अशा प्रकारे एकूण 663 पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीमध्ये पिण्याच्या पाण्याचे पीएच, टीडीएस, अवशिष्ट क्लोरीन व गढुळपणा या घटकांची भारतीय मानक ब्युरो तसेच उझकएएज मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणी करण्यात आली. तपासणीअंती पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ही इखड व उझकएएज यांनी निर्धारित केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या मानकांनुसार योग्य असल्याचे आढळून आले आहे. पाणी गुणवत्तेबाबत तपासणी सातत्याने सुरू ठेवण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील नागरिकांना सूचित करण्यात येते की, सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत आहे याची नोंद घ्यावी व याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित विभाग कार्यालयात अथवा 1800222309 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai