मॅरेथॉनमध्ये 950 महिलांची धाव
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 05, 2024
- 281
नवी मुंबई ः 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका आणि डॉ. डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता विशेष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी वाय पाटील स्टेडियमपासून ही मॅरेथॉन सुरू होऊन नेरूळ रेल्वे स्टेशन व पुन्हा स्टेडियम अशा 3.5 किमी अंतरात आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 950 महिलांनी सहभागी होत ही मॅरेथॉन यशस्वी केली.
याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे समाजविकास विभागाचे उपायुक्त श्री. किसनराव पलांडे, तुर्भे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीम. अश्विनी कुसुरकर व महानगरपालिकेचे समाजविकास अधिकारी श्री. सर्जेराव परांडे उपस्थित होते. महिला मॅरेथॉन स्पर्धेचे पारितोषिक वितरण या मान्यवरांसह स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज या विभागाच्या विभागप्रमुख श्रीम. शिल्पा वनिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या महिला मॅरेथॉनच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai