इंदौरमध्ये पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण कामांचे सादरीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 11, 2024
- 389
नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या वतीने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर यांच्या माध्यमातून इंदौर शहरात आयोजित "अन्वेषण" या ‘शहराच्या दृष्टीकोनातून संसाधने, नियोजन आणि वितरण' विषयक उपक्रमात नवी मुंबई शहराचे माहितीपूर्ण सादरीकरण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेस पाचारण करण्यात आले होते. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांचचे सादरीकरण केले.
इंदौर शहरात झालेल्या "अन्वेषण" या स्वच्छ सर्वेक्षणांच्या अनुषंगाने झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत देशातील विविध शहरांचे आयुक्त, सह आयुक्त, मुख्याधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी नवी मुंबई महापालिकेलाही आमंत्रित करण्यात आले होते. नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी सादरीकरणाव्दारे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांची माहिती याठिकाणी उपस्थित विविध शहरांच्या प्रतिनिधींसमोर सादरीकरणाव्दारे दिली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विविध प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण काम झालेले आहे. यामध्ये फिश फेड, शाळांतील ड्राय वेस्ट बँक, रिसायकल बझार रिसायकल मार्ट 92 थ्री आर सेंटर्स, स्क्रॅपनेस्ट यासारख्या उपक्रमांतून ‘थ्री आर' ची प्रभावी अंमलबजावणी, प्लास्टिमॅन, ग्रीनसोल, आकांक्षी शौचालय यासारखे अभिनव उपक्रम अशी अनेक उल्लेखनीय कामे नवी मुंबई महानगरपालिका करीत आहे. त्याचप्रमाणे लोकसहभागावर विशेष भर देण्यात येत आहे. अशाप्रकारे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नवी मुंबईच्या वैशिष्टपूर्ण कामांची माहिती उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाच्या वतीने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर यांच्या माध्यमातून प्रा. श्रुती तिवारी यांच्या समन्वयानुसार यशस्वीरित्या संपन्न झालेल्या "अन्वेषण उत्कृष्टतेचे केंद्र" या अभिनव उपक्रमात देशातील विविध शहरांमधून उपस्थित उच्च अधिकाऱ्यांसमोर नवी मुंबईतील स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केलेल्या उल्लेखनीय कामांचे सादरीकरण करण्यास मिळणे ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai