5 प्राथमिक शाळा अनधिकृत
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2024
- 365
प्रवेश न घेण्याचे महापालिकेचे आवाहन
नवी मुंबई ः महानगरपालिका क्षेत्रात मार्च 2024 अखेर 5 प्राथमिक शाळा शासनाची / नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही.
तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा तात्काळ बंद करावी. अन्यथा आपणाविरूध्द बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 18 (5) नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे.
या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. तसेच ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असेही महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
अ.क्र. संस्थेचे नांव शाळेचे नांव व पत्ता माध्यम
1 इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर-8 बी, सी.बी.डी. बेलापूर. इंग्रजी
2 ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, अग्रीपाडा, मुंबई इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, सेक्टर-27, नेरूळ इंग्रजी
3 आटपती एज्युकेशन ट्रस्ट, नेरूळ, सिवूड. ऑर्किडस्? द इंटरनॅशनल स्कुल (), सीवुड, सेक्टर-40, नेरूळ. इंग्रजी
4 इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोली इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाले इंग्रजी
5 मारानाथ संस्था शालोम प्रि प्रायमरी स्कुल, शिवशक्तीनगर, शर्मायी मंदिर रोड, तुर्भे स्टोअर्स, नवी मुंबई. इंग्रजी
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai