तुटवड्यामुळे भाज्यांचे भाव वाढले
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 10, 2024
- 378
नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबई परिसरामध्ये भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. फरसबीचे दर एक आठवड्यात आठ पट वाढले आहेत. होलसेल मार्केटमध्ये 160 ते 180 व किरकोळ मार्केटमध्ये 250 ते 280 रुपये किलो दराने फरसबी विकली जात आहे. वाटाणा, गवार, घेवडा, दोडक्यानेही किरकोळ मार्केटमध्ये शंभरी ओलांडली असून, कोथिंबीरची एक जुडी 60 रुपयांना विकली जात आहे.
तीव्र उन्हाळा व पाणी टंचाईमुळे भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाले आहे. मुंबई बाजार समितीमध्येही आवक कमी होऊ लागली आहे. सोमवारी 545 ट्रक, टेम्पोमधून 2818 टन भाजीपाल्याची आवक झाली. त्यामध्ये 4 लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक आठवड्यापूर्वी बाजार समितीमध्ये फरसबी 20 ते 24 रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर 160 ते 180 रुपये किलोंवर पोहोचले आहेत. घेवडा 20 ते 24 रुपयांवरून 40 ते 50 रुपयांवर गेला आहे. वाटाणा 34 ते 40 वरून 90 ते 100 रुपये किलोवर पोहोचला आहे. पालेभाज्यांचे दरही वाढू लागले आहेत. शेपू बाजार समितीमध्ये 30 ते 50 रुपये जुडी व किरकोळ मार्केटमध्ये 50 ते 60 रुपयांचा विकली जात आहे. कोथिंबिरीच्या जुडीचे दर बाजार समितीमध्ये 15 ते 50 जुडीपर्यंत पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्ये एका जुडीसाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. पुढील काही दिवस बाजारभाव तेजीत राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. बाजार समितीमधील भाजीपाल्याचे होलसेलचे दरभाजी 27 मे 3 जून फरसबी 20 ते 24 160 ते 180 वाटाणा 34 ते 40 90 ते 100 भेंडी 16 ते 28 36 ते 50 घेवडा 20 ते 24 40 ते 50 दोडका 24 ते 32 40 ते 50 कारले 30 ते 40 35 ते 45 मिरची 34 ते 60 40 ते 80 काकडी 12 ते 20 16 ते 26 किरकोळ मार्केटमधील प्रतिकिलोचे दर फरसबी 250 ते 280 वाटाणा 140 ते 160 भेंडी 80 घेवडा 120 दोडका 120 कारले 100 मिरची 100काकडी 60 ते 70 गवार 100
- लसूणच्या दरवाढीचा विक्रम
यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी जुनच्या सुरुवातीला बाजार समितीमध्ये लसूण 40 ते 65 रुपये किलो दराने विकला जात होता. यावर्षी हेच दर 90 ते 220 रूपयांवर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये 280 ते 300 रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे. राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये 80 ते 230 रुपये किलोपर्यंत दर आहेत. मुंबई बाजार समितीमध्येही गतवर्षीच्या जुन महिन्यापेक्षा बाजारभाव दुप्पट झाले आहेत. लसूणचे उत्पादन कमी झाले असल्यामुळे हा फरक पडत आहे. दिवाळीदरम्यान काही प्रमाणात दर कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai