वाशी रेल्वे स्टेशन परिसर झाला स्वच्छ
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2024
- 357
नवी मुंबई ः स्वच्छ भारत मिशनने जाहीर केलेल्या सफाई अपनाओ, बिमारी भगाओ या अभियानाच्या अनुषंगाने सगळीकडे नागरिकांच्या सहभागातून विशेष स्वच्छता मोहीमा राबविल्या जात आहेत. यामध्ये रेल्वे स्टेशन व परिसराची स्वच्छता हा घटक असून याअंतर्गत वाशी रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
शहर स्वच्छतेसाठी अत्यंत सक्रिय असणारी नवी मुंबई महानगरपालिका स्टेशन्स परिसराच्या स्वच्छतेविषयी जागरूक असून नुकतीच वाशी रेल्वे स्टेशन परिसर येथे सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये अति. आयुक्त सुनिल पवार सक्रिय सहभागी होते. त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे, स्वच्छता अधिकारी सुर्यकांत म्हात्रे तसेच वाशी विभागातील अधिकारी-कर्मचारी, नवी मुंबई महानगरपालिका व सिडको महामंडळाचे स्वच्छतामित्र यांच्यासह टिळक महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामधील एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी आणि नागरिक उत्साहाने सहभागी झाले. या विशेष सखोल स्वच्छता मोहीमेत 95 जणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत वाशी रेल्वे स्टेशन परिसराच्या स्वच्छतेत आपले योगदान दिले तसेच माझी वसुंधरा अभियानाची व कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंधासह स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
- नेरुळ रेल्वे स्टेशन
नेरुळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील परिसरात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत नेरुळ विभागाचे सहा.आयुकत् तथा विभाग अधिकारी डॉ.अमोल पालवे यांनी विभागातील अधिकारी, कर्मचारीवृंद व स्वच्छता मित्रांसह सक्रीय सहभागी होत स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. यामध्ये महाविदयालयीन एनएसएस विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, स्थानिक रीक्षा ड्रायव्हर तसेच नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. प्लास्टिक बॉटल्स, रॅपर्स, प्लास्टिक, थर्माकोल व कागदाचे तुकडे अशा प्रकारचा कचरा जमा करुन नेरुळ रेल्वे स्टेशनचा परिसर साफ करण्यात आला. यामध्ये एकूण 50 गोणी कचरा जमा करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai