राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडून नमुंमपाच्या स्वच्छता कामाची प्रशंसा
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 14, 2024
- 456
नवी मुंबई ः केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयास भेट देत पालिकेच्या वतीने सुरु असलेल्या स्वच्छता कामांची तसेच स्वच्छतामित्र व सफाईमित्र यांच्यासाठी महानगरपालिका करीत असलेल्या कामाची प्रशंसा केली. यापुढील काळात अधिक चांगले काम होईल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी काही मौल्यवान सूचनाही केल्या.
नवी मुंबई पालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांचे स्वागत केले. यावेळी आयुक्तांनी पालिकेच्या स्वच्छताविषयक कार्याची आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येत असलेल्या कामाची व सोयीसुविधांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. महानगरपालिका स्वच्छताकर्मींचा उल्लेख स्वच्छतामित्र व सफाईमित्र करते, यामुळे स्वच्छताकर्मींच्या सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होते याची दखल सदस्य महोदयांनी घेतली. यावेळी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी.वावा यांनी नवी मुंबई पालिकेच्या स्वच्छताविषयक विविध वाहनांची व यंत्रसामुग्रीची प्रत्यक्ष पाहणी केली व सफाईमित्रांशी थेट संवाद साधला. इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेचे काम खूप पुढारलेले असून याठिकाणी स्वच्छता कामगारांच्या सुरक्षेची व आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असल्याबद्दल डॉ.पी.पी.वावा यांनी समाधान व्यक्त केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai