विद्यार्थ्यांनी बनविल्या टाकाऊपासून शोभिवंत वस्तू
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2024
- 387
नवी मुंबई ः शालेय स्तरावर प्लास्टिक बॉटल्सपासून शोभिवंत वस्तू बनविण्याच्या अभिनव उपक्रमाचे आयोजन नवी मुंबई पालिका शिक्षण विभागाच्या वतीने शालेय स्तरावर करण्यात आले होते. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या 57 प्राथमिक, 23 माध्यमिक शाळांप्रमाणेच खाजगी 333 शाळांतील 1 लाख 570 विद्यार्थ्यांनी सहभागी होत प्लास्टिकच्या बाटल्यांपासून शोभिवंत वस्तू तयार केल्या. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पालकही विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते.
या उपक्रमामधून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मुक्त वाव मिळाल्याचे अनुभवता आले. प्लास्टिक बॉटल्सपासून विद्यार्थ्यांनी पेन होल्डर, फुलदाण्या, गृहसजावटीच्या नानाविध वस्तू, फुले असे विविध अविष्कार घडविले. प्रदर्शनात मांडलेल्या शोभिवंत वस्तूंमधील वैविध्य विद्यार्थ्यांच्या कुशलतेचे कौतुक करण्यासारखे होते.
स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रूजविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शालेय पातळीवरील नानाविध उपक्रमांना खाजगी शाळा व्यवस्थापनांचेही चांगले सहकार्य मिळत असून विद्यार्थ्यांमध्येही एक प्रकारचा उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या टाकाऊपासून शोभिवंत वस्तू तयार करण्याच्या अभिनव उपक्रमात सहभागी होत जणू प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा निर्धारच व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai