वर्दींतल्या दर्दींचा कलाविष्कार जल्लोषात
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 25, 2025
- 483
अभिनेता स्वप्निल जोशीने केले पोलिसांमधील कलेचे कौतुक
नवी मुंबई : जनतेच्या रक्षणासाठी 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या शिलेदारांमध्येही अनेक कला दडल्या आहेत. त्यांच्यातही अनेक कलाकार सुप्तपणे वावरत असल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष वर्दींतल्या दर्दींचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर आले आहे. या जल्लोष कार्यक्रमाच्या पर्व 2 मध्ये नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी हिंदी-मराठी गीत गाऊन, डान्स व इतर कला सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यामुळे या वर्दींतल्या दर्दींचा कलाविष्कार मोठ्या जल्लोषात पार पडल्याचे दिसले.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांमध्ये देखील अंगभूत कलागुण असतात. परंतु त्यांना आपल्यातील कलागुणांना वाव देण्याची फारशी संधी मिळत नाही आणि व्यासपीठही उपलब्ध होत नाही. याकरिताच नवी मुंबचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्या संकल्पनेतुन वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रातील सभागृहात गुरुवारी जल्लोष वदतल्या दर्दींचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. यावेळी पोलिसांमध्ये दडलेल्या कलाकारांनी हिंदी-मराठी गीते सादर केली. तसेच डान्स व इतर कला सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे, पोलीस मुख्यालयाचे पोलीस उप आयुक्त संजयकुमार पाटील, परिमंडळ-1चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, वाहतुक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे, विशेष शाखेच्या पोलीस उप आयुक्त रश्मि नांदेडकर यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी मराठी सिने अभिनेता स्वप्नील जोशी याने जल्लोष कार्यक्रमात हजेरी लावून सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.
पोलिसांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यावरील कामाचा ताण कमी व्हावा, त्यांच्यामध्ये दडलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी गेल्या वष जल्लोष या कार्यक्रमाची छोटीशी सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे स्वरुप आता मोठे झाले असून यातून चांगले कलाकार निर्माण होतील असे स्पष्ट करतानाच पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी या पुढील काळात देखील हा कार्यक्रम सुरु राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. - मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई
- कलेचे सादरीकरण कौतुकास्पद
जल्लोष वर्दींतल्या दर्दींचा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या माणसांनी आपल्या माणसांसाठी आपलेपणाने केलेला कार्यक्रम आहे. प्रत्येक कलाकार तळमळीने कला सादर करत होते, त्यामुळे पोलीस बांधवानी केलेले अनेक सादरीकरण हे रियालिटी शो असल्यासारखा भास झाल्याचे स्वप्निल जोशी याने स्पष्ट केले. सर्व कलाकार पोलिसांचे विशेष कौतुक केले. पोलिसांच्या जीवनात इतका ताण तणाव असताना, देखील त्यांनी इतकी मोठी उर्जा व सकारात्कमता घेवून केलेले कलेचे सादरीकरण कौतुकास्पद असून हे सर्व सामान्य लोकांसाठी धडा असल्याचे देखील स्वप्निल जोशी याने स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai