ज्येष्ठ नागरीकांना मोफत प्रवासासाठी स्मार्ट कार्ड योजना
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 11, 2025
- 336
नवी मुंबई ः महापालिका परिवहन उपक्रमाच्या 29 व्या वर्धापन दिनी बसेस मधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना ऑनलाईन स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. मोफत प्रवासासाठी लागणारे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठ नागरीकांना नजिकच्या पास सेंटर किंवा तुर्भे आगारात जावून कागदपत्रांची पुर्तता करावी लागत होती.
आता नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाने नवी मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा लाभ अधिक सुलभ व सोपा करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या एनएमएमटी बस ट्रॅकर ॲप वर सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास पाससाठी अर्ज भरण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी एनएमएमटी पास केंद्रात जाण्याची गरज नाही.
प्राप्त करून घेण्यासाठी खालील प्रमाणे प्रक्रिया करणे आवश्यक आहे.
1. एनएमएमटी बस ट्रॅकर ॲप वर ऑनलाइन अर्ज भरा.
2. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
3. ऑनलाईन स्मार्ट कार्डसाठी लागणाऱ्या 50 शुल्काचा भरणा केल्यानंतर सदर पोस्टाद्वारे पाठविण्यात येईल.
मोफत प्रवासाकरिता ऑनलाईन स्मार्ट कार्ड योजनेचा लाभ नवी मुंबईतील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी घेण्याबाबत परिवहन प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai