Breaking News
364 पदांना, त्यासाठीच्या खर्चास मान्यता
मुंबई ः राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या 346 पदांना व त्यासाठीच्या खर्चास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी सूमारे 22 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे 346 पदांच्या मनुष्यबळाचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. यापैकी 310 पदे नियमित असतील तर 36 पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत. नियमित पदे पुढीलप्रमाणे (पदनाम आणि संख्या) - विशेष पोलीस महानिरीक्षक- एक, पोलीस उपमहानिरीक्षक एक, पोलीस अधीक्षक-तीन, अपर पोलीस अधीक्षक-तीन, पोलीस अधीक्षक- 10, पोलीस निरीक्षक 15, सहाय्यक पोलीस निरीक्षक - 15, पोलीस उपनिरीक्षक - 20, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक - 35, पोलीस हवालदार - 48, पोलीस शिपाई - 83, चालक पोलीस हवालदार -18, चालक पोलीस शिपाई -32, कार्यालय अधीक्षक - एक, प्रमुख लिपीक - दोन , वरिष्ठ श्रेणी लिपीक -11, कनिष्ठ श्रेणी लिपीक - सात, उच्च श्रेणी लघुलेखक - दोन, निम्न श्रेणी लघुलेखक तीन.
बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाची पदे ( पदनाम आणि संख्या या क्रमाने) वैज्ञानिक सहाय्यक-तीन, विधी अधिकारी - तीन, कार्यालयीन शिपाई -18, सफाईगार - 12 एकूण - 36. यासाठी येणाऱ्या आवत खर्च रुपये 19 कोटी 24 लाख 18 हजार 380 रुपये तर वाहन खरेदीसह अनावत खर्चास 3 कोटी 12 लाख 98 हजार 380 रुपये मान्यता देण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai