गरजेपोटी बांधकामांच्या सर्वेक्षणासाठी ठेकेदार नियुक्त
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 08, 2025
- 250
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेऊन कार्यवाहीचे सिडकोला आदेशही दिले होते. त्यानुसार, आता कुठे सिडको गरजेपोटीच्या बांधकामांच्या सर्वेक्षणाचे काम करून कोणती बांधकामे नियमित करता येतील आणि कोणती अनधिकृत ठरतील, हे आता खासगी संस्था अर्थात ठेकेदार शोधणार आहे. सोमवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे.
नवी मुंबईसह उरण आणि पनवेल तालुक्यातील 95 गावांतील प्रकल्पग्रस्तांनी गाव व मूळ गावठाण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे उभारली आहेत. कुटुंबांच्या गरजेनुसार केलेली ही बांधकामे सिडकोने अनधिकृत ठरविली आहेत. त्यामुळे ती नियमित करावीत, अशी प्रकल्पग्रस्तांची जुनी मागणी आहे. स्वतंत्र विभाग स्थापन प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 25 फेब्रुवारी 2022 पर्यंतची गरजेपोटीची सर्व बांधकामे नियमित करण्याचा तत्कालीन सरकारने निर्णय घेऊन तसा शासकीय आदेशही पारीत केला. त्यानुसार, कार्यवाही करण्यासाठी सिडकोने विशेष विभागही सुरू केला, परंतु पाच महिन्यांत या विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. या पार्श्वभूमीवर गरजेपोटीच्या बांधकामांचे सर्वेक्षण आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खासगी ठेकेदाराच्या नियुक्तीचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे. या कामासाठी मे. मोनार्च सर्वेअर्स ॲण्ड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लिमिटेड या संस्थेची नियुक्ती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजली
K. Krishnan
- श्रद्धांजली
- June 14
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai