2111 इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 27, 2025
- 202
नवी मुंबई ः उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेमध्ये पारीत केलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न करता वापर सुरू केलेल्या इमारतींची यादी नवी मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच पालिकेची सर्व 8 विभाग कार्यालये याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर 2111 इमारती/सोसायट्यांना भोगवटा प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
उच्च न्यायालय मुंबई यांनी विषयांकित याचिकेत दि.25 ऑक्टोबर 2024 रोजी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींची यादी सादर करणेबाबत आदेशीत केलेले आहे. त्यास अनुसरून सर्व विभाग कार्यालयांनी सर्वेक्षण करुन बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींचा अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अभिलेखातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या परंतू भोगवटा प्रमाणपत्र न घेता वापर सुरू असलेल्या इमारतींची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीत नमूद इमारती/सोसायटी यांनी बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेऊन, भोगवटा प्रमाणपत्र न घेता, वापर सुरू केला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. सदरची बाब नियमास धरुन नाही. सदर यादीत नमूद केलेल्या 2111 इमारती / सोसायटी मधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र घेतलेल्या सर्व इमारतींना वापर सुरू करण्यापूव भोगवटा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
तरी संबंधितांनी भोगवटा प्रमाणपत्र मिळणेबाबतचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर करुन भोगवटा प्रमाणपत्र घ्यावे. अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 च्या तरतूदीनुसार पदनिर्देशीत अधिकारी यांचेमार्फत नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, असे पालिकेने सूचित केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai