महिला विशेष बससेवा सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 15, 2025
- 206
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू या मार्गावरील मार्ग क्र.116 व 117 या मार्गांवर ‘महिला विशेष’ बससेवा सुरु करण्यात आली आहे. जास्तीत जास्त महिला प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन उपक्रमाकडून करण्यात आले आहे.
नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महापालिका हद्दीत व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, दहिसर, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात 24 सर्वसाधारण व 46 वातानुकुलीत अशा एकूण 70 बस मार्गावर प्रवाशी सेवा देण्यात येत आहे. या बसमार्गांवर दैनंदिन 2.27 लाख प्रवाशी प्रवास करीत आहेत. त्यामध्ये महिला प्रवाशांना 50% सवलत दिल्याने सध्या परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये दैनंदिन महिला प्रवाशांची संख्या 1 लाख इतकी आहे.
परिवहन उपक्रमाच्या अटल सेतू मार्गावरुन चालणाऱ्या वातानुकूलित बसमार्ग क्र.116 तुर्भे आगार/नेरूळ बस स्थानक ते वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे खारकोपर तसेच बसमार्ग क्र.117 खारघर से.35 ते वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे पळस्पे फाटा, या मार्गांवर महिलांकरीता विशेष बससेवा 14 ऑगस्ट पासून सुरु करण्यात येत आहे.
मार्ग क्रमांक ठिकाण व वेळ
116 नेरुळ ब.स्थानक ते वर्ल्ड ट्रेड सेंटर08.05-वर्ल्ड ट्रेड सेंटर ते नेरुळ ब.स्थानक 18.25
117 खारघर से.35 ते वर्ल्ड ट्रेड सेंटर 08.00 वर्ल्ड ट्रेड सेंटर ते खारघर से.35 18.50
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
भावपूर्ण श्रद्धांजली
K. Krishnan
- श्रद्धांजली
- June 14
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai