सखी कर्तृत्वाचा सन्मान उत्साहात
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 24, 2026
- 32
विविध संस्था, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा करणाऱ्या महिलांचा गौरव
पनवेल : महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगार, उद्योग आणि प्रॉडक्ट मार्केटिंगच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ‘सखी कर्तृत्वाचा सन्मान’ हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि गार्गीज् ग्रुप, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित नगरसेविकांचा तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे समाजाच्या पायाभूत स्तरावर निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, हॉस्पिटलमधील आया, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच शाळांमधील आया या महिला कर्मचाऱ्यांचा ‘सखी कर्तृत्वाचा सन्मान’ या माध्यमातून गौरव करण्यात आला. परंपरागत बुरूड व्यवसाय जपणाऱ्या सुलोचना पांडुरंग खैरे (वय 85) आणि सुशीला अनंत खैरे (वय 80) यांनी जवळपास सहा दशकांहून अधिक काळ हा व्यवसाय जपल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या दिपा पनवेलकर, स्मिता साखरे, कमकुबेन भारवाड आणि ज्योतीबेन चावडा यांचा सन्मान करण्यात आला. सुरक्षा क्षेत्रात प्रामाणिक सेवा देणाऱ्या वनिता मांजरेकर (19 वर्षे सेवा) आणि अनिता माळी (अमिटी युनिव्हर्सिटी येथे 5 वर्षे सेवा) यांचाही गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यासाठी शुभा चंदेरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या शैला खाडे यांचाही सन्मान करण्यात आला. टिफिन व केटरिंग व्यवसायातील सुरेखा चाळके, सारिका तुपे आणि सुलभा धनावडे यांचा सन्मान करण्यात आला. वाहतूक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनिता मागडे (शाळा बस चालक) आणि आशा घालमे (रिक्षा चालक) यांचाही गौरव करण्यात आला. अंगणवाडी क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या अरुणा गवते (41 वर्षे सेवा) आणि सुनिता पाटील (20 वर्षे सेवा) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या शोभा जाधव, दर्शनापाटील आणि सुनीता जाधव या आशा वर्कर महिलांचाही गौरव करण्यात आला. नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या सौ. विशाखा विजयकुमार ठाकूर (24 वर्षे सेवा, वाशी) यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
विशेष सन्मानामध्ये अपेक्षा वाघमारे (ग्रामसखी), तेजस्विनी गोंधळी, सीमा शेटे, नूतन रानडे, बेबीताई, हेमा कुदळे तसेच महिला पोलीस शिपाई साधना पवार यांचा गौरव करण्यात आला. पनवेल व परिसरातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्याचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये पनवेल स्मार्ट मम्मीज्, एकता महिला मंडळ, संवेदना महिला मंडळ, डायमंड फाउंडेशन , जागृती फाउंडेशन, दिशा मंच, छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबे, सहकार भारती महानगर जिल्हा पनवेल महिला प्रमुख ॲड. सौ. अपर्णा सुधीर नाडगौडी, सप्तशृंगी महिला मंडळ कळंबोलीआणि वाणी समाज मंडळ पनवेल यांचा समावेश होता.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai