देहरंग ते पनवेल नवीन जलवाहिनी टाकणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 27
115 कोटींची निविदा प्रसिद्ध
पनवेल ः महानगरपालिकेच्या देहरंग धरण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आता 115 कोटींची कामे मार्गी लागणार असून नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. पनवेलकरांच्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली असून, देहरंग धरणावर आधारित वाढीव पाणीपुरवठा योजनेला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दीर्घकालीन नियोजनाला सुरुवात करण्यात आली असून, यासाठी मंगळवारी 115 कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेने पाणी संकटावर मात करण्यासाठी देहरंग धरणातून वाढीव पाणीपुरवठा करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला गती दिली आहे. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे काम पुढे सरकत असून मंगळवारी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी यासाठी सुमारे 115 कोटी 48 लाख रुपयांच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. देहरंग धरणाची क्षमता 3.125 घनलक्ष मीटर असून सध्या दररोज सुमारे 16 दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरवठा केला जातो. मात्र विद्यमान 550 मिमी व्यासाच्या जिर्ण जलवाहिनीमुळे पुरवठ्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे नवीन प्रस्तावानुसार 1100 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार असून देहरंग ते पनवेलदरम्यान सुमारे 16.5 किलोमीटर अंतरावर ही व्यवस्था उभारली जाणार आहे. तसेच धरणाजवळ 70 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि 9.40 एमएलडी क्षमतेची साठवण टाकी उभारली जाणार आहे. पावसाळ्यात धरणातून वाहून जाणारे पाणी वापरून नवीन पनवेल, कळंबोली व कामोठे या सिडको वसाहतींची तहान भागवण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला होता. या आराखड्याला नगर संचालनालयाची मंजुरी अद्याप मिळालेली नाही. मात्र मंजूरीच्या प्रतिक्षेत न राहता महापालिका आयुक्तांनी संबंधित योजनेची अंमलबजावणीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दरवर्षी पावसाळ्यानंतर धरण तुडुंब भरत असतानाही पावसाळा व हिवाळ्यात खारघरसारख्या भागात पाणीटंचाई भासते. नवीन जलयोजनेमुळे अतिरिक्त पाणी साठवून ते शहराला पुरवता येण्याचे महापालिकेने नियोजन आहे. मंगळवारी निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यावर 18 महिन्यात ही कामे होणे अपेक्षित आहे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai