अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 28
पनवेल महापालिकेची धडक मोहीम
पनवेल ः रेल्वे स्थानक परिसर, पदपथ, रस्ते, मोकळ्या जागा येथे अनधिकृतपणे बस्तान मांडणारा व्यावसायिकांच्या गाड्यांवर, शेडवर पालिकेने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये खारघर, कळंबोली, कामोठे येथील अतिक्रमणे व अनधिकृत फेरिवाले यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून पादचारी व वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या वतीने पालिका हद्दीतील चारही प्रभागातील अनधिकृत झोपड्या, शेड, फळ-भाजी स्टॉल्सवर आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनूसार उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी तोडक कारवाई करण्यात येत आहेत. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार मानसरोवर स्थानक परिसरात अनाधिकृतपणे उभारण्यात आलेल्या टपऱ्या व झोपड्यांवरती जेसीबीच्या सहाय्याने प्रभाग समिती ‘क’ च्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली. संबंधित विभागाच्या पथकाने नियोजनबद्धरीत्या ही मोहीम राबवून परिसर अतिक्रमणमुक्त केला. याचबरोबर कामोठे येथील अग्निशमन दलासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या प्लॉटवरती अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या, स्टॉल्स उभारण्यात आले होते. उपायुक्त नानासाहेब कामठे व सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिक्षक दशरथ भंडारी यांनी जेसीबीच्या सहाय्याने याठिकाणी तोडक कारवाई करून संपूर्ण प्लॉट रिकामा केला.
कळंबोली प्रभाग समिती ब मधील सेंट जोसेफ शाळेजवळ अनधिकृतपणे फूटपाथ वर आणि वाहनांमधून फळ व भाजी विकणाऱ्या वाहनांवर कारवाई करून 02 टेम्पो वाहने व 02 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. प्रभाग समिती ब च्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे सेंट जोसेफ शाळेजवळ येथे होणारी ट्राफिकची समस्या कमी होण्यास मदत होत आहे. कळंबोली मधील फूटपाथवरील अनधिकृत फळे, भाजी विक्रेते तसेच इतर व्यवसाय स्टॉल्स वरही सातत्याने कारवाई करून फूटपाथ स्वच्छ करण्यात येत आहेत. याचप्रमाणे प्रभागातील अनधिकृत बॅनर्स वरतीही तोडकर कारवाई करण्यात येत आहे.
महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ अंतर्गत अतिक्रमण विभागाच्या वतीने खारघर येथे नुकतीच अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करून हिरानंदानी येथील मार्जिनल स्पेस मोकळा करण्यात आला. तसेच अनधिकृत आईस्क्रीम -फालुदा विक्री करणाऱ्या 6 गाड्या जप्त करण्यात आल्या. खारघर शहरात विविध ठिकाणी अनधिकृत आईस्क्रीम -फालुदा विक्री होत असल्याचे दिसून येत आल्याने आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार या आईस्क्रीम -फालुदा विक्री करणाऱ्या गाड्यांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने नुकतीच जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये सेक्टर 7,12, 18, 19 अशा विविध सेक्टर मध्ये अनधिकृत आईस्क्रीम -फालुदा विक्री करणाऱ्या 6 गाड्या जप्त करण्यात आल्या. याबरोबर हिरानंदानी सेक्टर 15 येथील फतुश शॉप समोर 15 स्टील स्टूल जप्त करण्यात आले. तसेच सेक्टर 7 हिरानंदानी येथे टेबल जप्त करण्यात आले. महापालिकेच्या वतीने अशा प्रकारच्या अनधिकृत अतिक्रमणांवरती पुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai