स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजूरी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 22
पनवेल ः महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा 09 एप्रिल रोजी घेण्यात आली. यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली. यात शहरातील रंगरंगोटीची कामे, प्रशासकीय सेवेतील संगणकीय कामकाज, अतिक्रमणे, पदपथ दुरुस्ती, गाढी नदीवर पुल बांधणे अशा विषयांवर चर्चा करण्यात आली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी रंगरंगोटी व ग्राफिटी करण्याचा विषय मंजूर करताना कंत्राटदाराला 20 टक्के रक्कम कपात करून रक्कम देण्याबाबत सभापतींनी सूचित केले. पनवेल महानगरपालिकेतील संगणक, नेटवर्क आणि इतर संगणकीय साहित्याचे कामकाज, निगा-दुरूस्ती व देखभाल करण्याच्या विषयास मंजूरी देण्यात आली. विविध विभागांच्या मागणीनुसार भाडेतत्वावर उपलब्ध करून घेण्यात आलेल्या जागांना भाडेपट्टा मुदतवाढ देण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यामधील एकुण सात जागांपैकी आवश्यक चार जागांना भाडेपट्टा मुदतवाढ देण्यात आली.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ प्र.क्र.1 कोयनावेळे व घोट या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील तळोजा नदीवरील पुलाचे बांधकाम करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजूर दिली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती-अ, प्रभाग क्र-1 मधील करवले या गावाला पायाभूत सुविधा पुरविणेचे उर्वरित काम करण्याचा विषय सभेत मंजूर करण्यात आला. अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निष्कासन करणेकामी अतिरीक्त 111 मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणेकामी कार्यादेश निर्गमित करण्याच्या विषयावरती चर्चा करून सदरचा मंजूर करण्यात आला.
पनवेल मार्गाजवळ पनवेल महानगरपालिका हद्दीतील अंतिम भुखंड क्र.506, पनवेल बाजुने ते करंजाडे मलः निस्सारण उदंचन केंद्राजवळ गाढी नदीवर नविन पुल बांधण्याच्या विषयास यावेळी सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिका हद्दीतील पोदी, सेक्टर-16 नवीन पनवेल (पूर्व) येथील ना-दुरुस्त फुटपाथ दुरुस्त करण्याच्या विषयास सभापतींनी मंजूरी दिली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai