पीएनजी जोडणी घेण्याचे पालिकेचे आवाहन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 22
पनवेल : शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पीएनजी जोडणी घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक गॅसचा वापर वाढवण्यावर भर दिला जात असून, त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की, पनवेल शहरात पायाभूत सुविधांची उभारणी सक्षमपणे झाल्यामुळे नैसर्गिक वायू वितरणाला गती मिळाली आहे. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) मार्फत अखंड पीएनजी व सीएनजी पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांच्या बैठका घेण्यात येणार असून, प्रभागनिहाय नोंदणी शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या 9 मार्चच्या आदेशानुसार घरगुती पीएनजी व सीएनजीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण इंधन उपलब्ध होणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेने आवश्यक परवानग्या व समन्वय उपलब्ध करून दिला आहे.
एमजीएलकडून ग्राहकांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. 16 मार्च ते 30 एप्रिल 2026 दरम्यान नवीन नोंदणी करणाऱ्यांना 500 रूपये किमतीचा मोफत गॅस दिला जाणार आहे. तसेच कोणतेही आगाऊ शुल्क न घेता मीटर बसवल्यानंतर बिल आकारले जाणार असून, हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. व्यावसायिक ग्राहकांसाठी नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी अज्ञात लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी किंवा बँक माहिती शेअर करू नये, तसेच केवळ अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
व्यावसायिक ग्राहकांसाठी आकर्षक योजना
- नोंदणी शुल्क पूर्णतः माफ, आवश्यक पायाभूत सुविधा कंपनीकडून उभारली जाणार,
- फसवणूक टाळण्यासाठी सूचना
- अज्ञात लिंकवर क्लिक करू नये-एपीके फाईल डाउनलोड करू नये-ओटीपी किंवा बँक संबंधित माहिती कोणाशीही शेअर करू नये-केवळ एमजीएल च्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावरच (निळा टिक चिन्हासह) विश्वास ठेवावा.
नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
1) रहिवासी पुरावा (कोणताही एक)2)वीज बिल3)इंडेक्स 2 ची प्रत4)पासपोर्ट5) ओळखपत्र (कोणताही एक)आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / वाहन चालविण्याचा परवाना6) ईमेल आयडी 7) पर्यायी मोबाईल नंबर
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai