महापालिकेतर्फे भव्य दिव्य मिरवणूकीचे आयोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 20
पनवेलः लोकसहभागातून महानगरपालिकेतर्फे 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पनवेल शहरामध्ये भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 07 एप्रिल रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नियोजन बैठक घेण्यात आली.
या वेळी मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, सुरक्षाव्यवस्था, स्वच्छता व विविध सुविधा याबाबत नियोजनविषयक चर्चा करण्यात आली. मिरवणुकीसाठी रुग्णवाहिका, थंडपाणी, अल्पोपहार, एनर्जी ड्रिंक, सुरक्षा रक्षक, लाईट व्यवस्था आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी परिवहन व्यवस्थापक गावडे यांनी दिली. उपस्थित नागरिकांच्या सूचना घेऊन त्याविषयी चर्चा झाली. तसेच यावेळी उपस्थित नागरिकांनी जयंतीसाठी उत्स्फुर्तपणे देणगी दिली. महापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांनी यावेळी आपले विचार मांडले तसेच सूचना दिल्या. यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. जयंती निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य चित्ररथ इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे व स्मृतिचिन्हे देण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये फ्लेक्स, बॅनर व विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावट केली जाणार आहे. निवडणूक मार्गावरील दोन्ही बाजूंना लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे. रूग्णवाहिका, अग्निशमन वाहने व आवश्यक संसाधनांच्या माध्यमातून सुरक्षिततेसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
- मिरवणूक मार्ग
जयंतीच्या दिवशी सकाळी 7 वाजता नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एकत्र जमून, पुष्पहार अर्पण केला जाईल. यावेळी पाठपूजा करुन मानवंदना दिली जाईल. यानंतर सकाळी 7.20 वाजता पुतळ्याजवळून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होईल. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, एम.टी.एन.एल. रोड, संत जगनाडे महाराज चौक, रोहिदास वाडा, टपाल नाका, कर्नाळा सर्कल, भाजी मार्केट, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, विरुपाक्ष मंदिर, निल सॉलिटीयर इमारत, छ. शिवाजी चौक या मार्गे नाट्यगृह येथे पोहोचून समाप्त होईल. त्यानंतर नाट्यगृह येथे पुढील कार्यक्रम होईल.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai