जनगणना फील्ड ट्रेनर प्रशिक्षण
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 10, 2026
- 23
पनवेल ः शासन निर्देशानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने जनगणना 2027 अंतर्गत फील्ड ट्रेनर तीन दिवसाचे प्रशिक्षण आयोजन आयुक्त महोदय मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनानुसार आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह येथे 6 एप्रिल ते 8 एप्रिल आयोजित करण्यात आले होते. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणांतर्गत 45 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास पनवेल महानगरपालिका उपायुक्त अभिषेक पराडकर ,जनगणना संचालनालयाचे जिल्हा समन्वयक अमनकुमार, मास्टर ट्रेनर रूचिता तेलंग यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान दिनांक 7 एप्रिल रोजी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी या प्रशिक्षणास भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहित केले. जनगणना विभाग प्रमुख रविना येवले यांनी प्रशिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणांतर्गत 45 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मनपा शिक्षक व कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश असून यावेळी प्रशिक्षकांना ‘जनगणना 2027’ चे राष्ट्रीय व प्रशासकीय महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जनगणनेमध्ये फील्ड ट्रेनर्सची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असून ते पुढील स्तरावरील प्रगणक व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देणारे प्रमुख दुवा आहेत, यामुळे हे प्रशिक्षण अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले.
सत्रामध्ये जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया, टप्पे व कार्यपद्धती यांचे सखोल विवेचन करण्यात आले. विशेषतः पहिल्या टप्प्यातील घरयादी व गृहगणना या घटकावर भर देण्यात आला. घरांची यादी तयार करताना अनुसरावयाची पद्धत, घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा, व आवश्यक माहिती संकलन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
डिजिटल प्रणाली व मोबाईल ॲप प्रशिक्षण
यंदाची जनगणना डिजिटल पद्धतीने होत असल्यामुळे मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर हा प्रशिक्षणाचा मुख्य भाग होता.प्रशिक्षार्थींना जनगणना मोबाईल ॲप डाउनलोड, लॉग-इन प्रक्रिया, तसेच त्यातील विविध मॉड्यूल्सचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. डेटा एंट्री करताना अचूकता राखणे, चुकीची माहिती टाळणे व योग्य पडताळणी करण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.
नकाशा वाचन व ले-आउट स्केच
- फील्डवरील कार्यासाठी आवश्यक असलेल्या नकाशा वाचन कौशल्यांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थींना एन्युमरेशन ब्लॉक ( ) समजून घेणे, क्षेत्राचे विभाजन करणे, तसेच प्रत्यक्ष पाहणीवर आधारित ले-आउट स्केच तयार करण्याच्या पद्धती शिकविण्यात आल्या.
- हे कौशल्य जनगणना प्रक्रियेतील अचूकता व सुसूत्रता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
तांत्रिक बाबी व डिजिटल साधनांची ओळख
- प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना व वेब पोर्टल यांची ओळख करून देण्यात आली.डेटा व्यवस्थापन, मॉनिटरिंग व अहवाल प्रणाली यांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माहिती भरताना होणाऱ्या सामान्य चुका व त्या टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.
- संवाद कौशल्ये व प्रत्यक्ष अडचणी
- फील्डवर काम करताना नागरिकांशी प्रभावी संवाद साधण्याचे महत्त्व प्रशिक्षणार्थींना अधोरेखित करण्यात आले.विविध परिस्थितींमध्ये येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या शंका व संभाव्य वाद यांचे निराकरण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षार्थींना सकारात्मक व संयमी दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देण्यात आला.
- एकुणच प्रशिक्षणार्थींना फील्ड ट्रेनर्सना जनगणना प्रक्रियेची सखोल माहिती, डिजिटल साधनांचा वापर, तसेच प्रत्यक्ष फील्डवर आवश्यक असणारी कौशल्ये यांची भक्कम पायाभरणी करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai