मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात जासई द्वितीय
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2026
- 22
उरण ः तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जासईने केलेल्या सर्वच लोककल्याणकारी कार्याची व जनतेच्या सर्वांगीण विकासाची कार्ये लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत जासईला उरण तालुक्यातून दुसरा क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत जासईने सर्वच घटकासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविले आहेत. अनेक विकासकामे केली आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाने ग्रुप ग्रामपंचायत जासईच्या कार्याचा गौरव करत दुसरा क्रमांक देऊन सन्मान केला आहे. जासईचे सरपंच संतोष घरत यांचा नेतृत्वाखाली जासई ग्रुप ग्रामपंचायतीने ‘मूख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान’ मध्ये अभिमानास्पद व गौरवास्पद कामगिरी केली आहे. जासई ग्रामपंचायतीने उरण तालूक्यात दूसरा क्रमांक पटकविला असून बक्षिसपात्र रक्कम-12 लाख ग्रामपंचायतला मिळणार आहे. ग्रामपंचायत जासईचे व्याप्ती व कारभार मोठा असला तरी या अभियानामध्ये सर्व घटक परिपूर्ण करून अभियान यशस्वी करण्यासाठी महत्वाचे योगदान देणाऱ्या सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येणारे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना (जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती) कार्यक्षम बनवणे आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत स्थानिक संस्थांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभाग वाढवणे, कर वसुली आणि डिजिटल सेवांचा वापर यांसारख्या निकषांवर आधारित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांचा गौरव केला जातो. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणे, प्रशासनात पारदर्शकता आणणे आणि ग्रामीण नागरिकांना सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांचा विकास करणे, कोणतेही समस्या निर्माण झाल्यास ते त्वरित सोडविणे आदी विविध कार्य उरण तालुक्यातील जासई ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी करण्यात येते. हे सर्व ग्रामपंचायतचे कार्य लक्षात घेऊन त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणून शासनाने ग्रुप ग्रामपंचायत जासईला तालुका स्तरीय दुसरा क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai