सिडकोचा चेंजिंग माईंडस उपक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 21
नवी मुंबई ः कर्मचारी कार्यक्षमता, नैतिकता, उत्तरदायित्व आणि लोकाभिमुख सेवा यांना नवी दिशा देण्यासाठी सिडकोमध्ये ‘ चेंजिंग माईंड’ या महत्त्वपूर्ण उपक्रमाची नव्या संकल्पना आणि तत्त्वज्ञानासह पुनश्च सुरुवात करण्यात आली. सिडको भवन येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी कार्यशाळेत महामंडळातील विभागप्रमुख आणि विभागीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पूर्वी या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात येत होते. मात्र, यावेळी प्रथमच संस्थेतील अनुभवी वरिष्ठ अधिकारी, त्यांचे ज्ञान, अनुभव आणि नेतृत्वगुण यांचा प्रभावीपणे उपयोग करून कर्मचाऱ्यांशी अधिक परिणामकारक संवाद साधण्याची अभिनव संकल्पना राबविण्यात आली. या माध्यमातून संस्थेच्या अंतर्गत बौद्धिक संपदेचा उपयोग करत सकारात्मक आणि परिणामकारक कार्यसंस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वक्त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, या उपक्रमाचा उद्देश केवळ भ्रष्टाचाराला आळा घालणे एवढाच मर्यादित नसून, सेवाभिमुख प्रशासन, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि परिणामकारक सेवा वितरण यांना संस्थात्मक संस्कृतीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा हक्क’ ‘राईट टू सर्विसेस’ उपक्रमामुळे शासकीय विभागांच्या कामगिरीचे सातत्याने मूल्यमापन होत असून, नागरिकांना अधिक वेगवान, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर दिला जात आहे.कार्यशाळेदरम्यान कार्यप्रणालीतील अडथळे दूर करणे, कामकाज अधिक सुसूत्र आणि कार्यक्षम बनविणे, प्रलंबित प्रकरणांचे वेळेत निवारण करणे तसेच नागरिकांच्या अपेक्षांशी सुसंगत कार्यसंस्कृती विकसित करणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, संस्थेमध्ये सकारात्मक परिवर्तनाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. ‘चेंजिंग माईंडस’ ही केवळ एक संकल्पना नसून विचार, वृत्ती आणि कार्यपद्धतीत सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारी प्रभावी चळवळ ठरणार असून, सिडकोच्या लोकाभिमुख, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनाच्या वाटचालीला नवी गती देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सिडकोच्या दक्षता विभागातर्फे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, उत्तरदायित्वाची जाणीव आणि सेवाभिमुख कार्यसंस्कृती विकसित करण्याचा संदेश देण्यात आला.
प्रत्येक परिवर्तनाची सुरुवात मनापासून होत असते. कोणतीही व्यवस्था बदलण्यापूर्वी आपल्या विचारसरणीत सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे. ‘चेंजिंग माईंडस’ हा केवळ प्रशिक्षण कार्यक्रम नसून स्वतःला अधिक सक्षम, संवेदनशील आणि उत्तरदायी बनविण्याचा प्रवास आहे. नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सेवाभाव आणि नैतिकता यांची सांगड घातल्यास कोणतीही संस्था उत्कृष्टतेच्या शिखरावर पोहोचू शकते. - शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai