क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 17
नवी मुंबई ः केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून नमुंमपा कार्यक्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सीसाईड यांच्यामार्फत नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या एकूण 100 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले.
भारत सरकारने देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या अनुषंगाने शासन क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार देत आहे. क्षयरुग्णांना शासनामार्फत उपचारादरम्यान प्रत्येक महिन्याला निक्षय पोषण योजनेअंतर्गत 1000 रुपयाची मदत थेट बँक खात्यामध्ये दिली जात आहे. केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार, डायग्नोस्टिक मदत, व्होकेशनल मदत या स्वरुपात मदत उद्योग समूह, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ति यांनी करावी असे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून नमुंमपा कार्यक्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई सीसाईड यांच्यामार्फत नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरुळ 1, शिरवणे, कुकशेत, सानपाडा व तुर्भे येथे उपचार घेणाऱ्या एकूण 100 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. सदर रुग्णांना या अतिरिक्त पोषण आहारामुळे यशस्वी उपचार पूर्ण करण्यास मदत होईल. सदर पोषण आहार किटच्या वितरण कार्यक्रमकरिता नमुंमपा वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रविण कटके तसेच रोटरी क्लबमार्फत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष मकोल, क्लबचे अध्यक्ष धनंजय सरकार व आर. एस. राघवन, सचिन भोले, नंद शाह, शैलेंद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. तरी केंद्र शासनाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमास सहकार्य करण्यास इच्छुक उद्योग समूह, स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी नमुंमपा आरोग्य विभाग मुख्यालय अथवा वेीांहर्पीांऽीपींल.ेीिस या ई-मेल आयडीद्वारे ‘निक्षय मित्र’ म्हणून संपर्क साधावा आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाला सहकार्य करुन एकजुटीने हातभार लावावा असे आवाहन करण्यात येत आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai