मागेल त्याला झाड अभियान
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 22
संदीप नाईक प्रतिष्ठानची 25 वर्षांची पर्यावरण संवर्धन मोहीम
नवी मुंबई ः जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नवी मुंबईतील संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने मागेल त्याला झाड अभियानाचा गुरुवारी कोपरखैरणे येथे सकाळी शुभारंभ करण्यात आला. संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने गेली 25 वर्षाहून अधिक काळ व्यापक प्रमाणात पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जाते आहे.
माजी आमदार संदीप नाईक यांच्या शुभहस्ते कोपरखैरणे येथे शालेय विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संस्थांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांना प्रातिनिधिक स्वरूपात वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. पृथ्वीवरील निसर्गाचा ठेवा आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत सुपूर्द करायचा आहे त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन संदीप नाईक यांनी यावेळी केले. मानव निसर्गाचा वापर आपल्या गरजांसाठी करतो मात्र अजाणतेपणी निसर्गाला हानी पोहोचते. पर्यावरणीय बदलांमुळे अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, पूर अशी संकटे येऊन मानव आणि पर्यावरणाची हानी होत असते. हे टाळण्यासाठी पर्यावरण संतुलन राखणे गरजेचे आहे, असे मत संदीप नाईक यांनी व्यक्त केले.
पर्यावरण संवर्धन केवळ जागतिक पर्यावरण दिनापुरता मर्यादित न ठेवता वर्षातील 365 दिवस पर्यावरण पूरक कृती आपण करायला हवी. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा गोष्टी टाळायला हव्यात जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल. पर्यावरण संवर्धनामध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गाला सहभागी करून पर्यावरण चळवळीची व्याप्ती वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शाळा, महाविद्यालये, गृह संकुले, सार्वजनिक जागा, औद्योगिक परिसर, डोंगर अशा विविध ठिकाणी त्या-त्या भागामध्ये जगतील आणि उपयोगी पडतील अशा वृक्षारोपांची लागवड करण्याची सूचना केली. वृक्षारोपे लावली म्हणजे निसर्गाप्रती आपले कर्तव्य पार पाडले, असे नाही तर लावलेली झाडे जगली पाहिजेत यासाठी जाणीवपूर्वक काळजी घेण्याचे आवाहन देखील संदीप नाईक यांनी केले. पर्यावरण चळवळ ही जन चळवळ व्हावी. आपण सर्व मिळून पर्यावरण रक्षणाची ही लढाई जिंकू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास शालेय विद्यार्थी, पर्यावरण प्रेमी संस्थांचे सदस्य, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेवक सचिन लवटे, नगरसेवक संदीप म्हात्रे, माजी नगरसेवक रमेश डोळे, नगरसेवक रॉबिन मढवी, प्राचार्य प्रताप महाडिक यांच्यासह निसर्गप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- वृक्षरोपे हवी असल्यास...
संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने मागील तीन वर्षे नवी मुंबईमध्ये मागेल त्याला झाड उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येतो आहे. यावर्षी देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून ज्या संस्था आणि व्यक्ती ज्यांना वृक्षारोपणासाठी वृक्षरोपे हवी आहेत त्यांनी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत 9326183525 या मोबाईल क्रमांकावर आपली मागणी नोंदवावी. संदीप नाईक प्रतिष्ठानतर्फे मोफत वृक्षरोपे उपलब्ध करून देण्यात येतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai