अधिक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आयुक्तांचे निर्देश
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 32
नवी मुंबई ः महानगरपालिकेची 26 नागरी आरोग्य केंद्रे, 2 माता बाल रुग्णालये व 3 सार्वजनिक रुग्णालये याव्दारे नागरिकांना आरोग्य सेवा पुरविल्या जात असून त्यामधील गुणवत्ता वाढीसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने नियमितपणे आढावा बैठका घेतल्या जात आहेत.
प्राथमिक स्तरावरील वैद्यकिय तपासणी व उपचार नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केले जात असून त्यांच्याकडे उपलब्ध होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्य स्थितीची माहिती अचूक व अद्ययावत असावी याकडे बारकाईने व काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. विविध प्रकारचे लसीकरण कार्यक्रम राबवितांना त्यामध्ये मोठया प्रमाणात सहभाग मिळावा व जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यादृष्टीने मोठया सोसायट्या, झोपडपट्टी भाग या ठिकाणी जागरूकता शिबीरे घ्यावीत. तसेच नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्यावा अशा सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या. यासाठी आरोग्य कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे व स्थानिक पातळीवर नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे असेही सूचित करण्यात आले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोगाचा धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही आत्तापासूनच प्रभावीपणे सुरु करावी असे निर्देशित करतांनाच मलेरिया प्रतिबंधासाठी सर्वात जोखमीचे क्षेत्र असलेल्या बांधकाम साईट्सवर लक्ष केंद्रीत करावे असेही सूचित करण्यात आले. महापालिकेच्या टेस्टिंग लॅबमध्ये थॅलेसेमिया, स्वाईन फ्ल्यू अशा चाचण्या करण्याबाबत कार्यवाही करावी असेही निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे ऑक्सिजन प्लान्टची स्थलांतरण कार्यवाही जलद करावी आणि सर्व व्हेन्टिलेटर उपयोगात आणण्याच्या दृष्टीने नियोजन करावे असेही आयुक्तांनी सूचित केले. आयुष्मान भारत कार्डची वितरण कार्यवाही जलद करावी तसेच महापालिकेकडे उपलब्ध होणारी सर्व प्रकारच्या रुग्णांची माहिती डिजीटल करण्याबाबतही पावले उचलावीत असेही सूचित करण्यात आले.
महापालिकेच्या रुग्णालयातील माता-बाल मृत्यूची माहिती घेतांना प्रत्येक मृत्यूची कारणमीमांसा जाणून घेऊन डेथ ऑडिट करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. आरोग्यशास्त्र हे संशोधन व चिकित्सेवर अवलंबून असल्याने तशा प्रकारे अभ्यास करुन सेवेची गुणवत्ता वाढविण्यावर भर दयावा आणि पालिकेमार्फत नियमितपणे सुरु असणारे लसीकरण कार्यक्रम, तपासणी मोहीमा, आरोग्य शिबीरे यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने अधिक प्रभावी कामगिरी करावी असे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने निर्देश देण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai