पालकांसाठी लवकरच विशेष तक्रार पोर्टल
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 18
खाजगी शाळांच्या प्रतिनिधींसोबत बैठक संपन्न
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे महापौर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे अधिकारी आणि नवी मुंबईतील खाजगी शाळांचे मुख्याध्यापक व प्रतिनिधी यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यामध्ये शाळा आकारत असलेल्या शुल्काचा आढावा घेण्यात आला. तसेच पालिकेच्या माध्यमातून पालकांसाठी लवकरच ऑनलाईन तक्रार पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
नवी मुंबईतील काही खाजगी शाळांनी विद्यार्थ्यांच्या शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ केल्याच्या आणि या संदर्भात पालकांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्न खिल्लारे, शहरातील सर्व खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, त्यांचे प्रतिनिधी आणि पालिकेचे शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शाळा नेमक्या कोणत्या निकषांवर, कोणत्या शासन निर्णयाच्या आधारे ट्युशन फी किंवा इतर शुल्क आकारतात, याचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. पालकांच्या समस्यांचे निवारण करणे हाच या बैठकीचा मुख्य उद्देश होता. जे शाळा प्रशासन आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही, त्यांच्यासाठी आगामी काळात नोडनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक नोडमधील शाळा आणि तेथील पालकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. तसेच, पालकांना आपल्या तक्रारी थेट मांडता याव्यात यासाठी पालिकेच्या माध्यमातून लवकरच ऑनलाईन तक्रार पोर्टल सुरू करण्यात येणार आहे.
महानगरपालिका खाजगी शाळांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी यामध्ये सवलत देऊन विविध सुविधा पुरवत असते; त्यामुळे महापालिकेचे या शाळांवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. शाळांकडून दरवर्षी होणाऱ्या अवाजवी फी वाढीला आळा बसावा आणि पालकांना दिलासा मिळावा, यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यापुढेही या संदर्भात कठोर पावले उचलली जातील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai