ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है - एकनाथ शिंदे
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 20, 2026
- 24
मुंबई ः 60 वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना झाली. आज हिरक महोत्सव आहे. नेते, मंत्री, शिवसेना हे माझं वैभव आहे. सर्वांना वाटलं मी काय बोलणार, कोण येणार, आज ये टायगर आपके सामने खडा है. काल परवापासून कुछ कुत्ते भोंक रहें हैं. कुत्ते झुंड मे आते हैं. टायगर अकेला आता है. कुत्ते भोंकते रहते है. टायगर शिकार करत है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अजून बाकी है असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात आणखी मोठे नेते पक्षात येतील असे संकेत दिले.
शिवसेनेचा हिरक महोत्सवी (60 वा) वर्धापन दिनानिमित्त शिंदे गटाचा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये पार पडला. सेनेचा जन्म महाराष्ट्रासाठी झाला, हिंदुत्वचा हुंकार आहे. मराठीचा निर्धार, प्रहार म्हणजे शिवसेना आहे बहिणचा आधार म्हणजे शिवसेना आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली. मोदी यांच्यावर एका ही भ्रष्टाचाराचा डाग लावण्याची हिम्मत कुणी केली नाही. हा देशाचा अभिमान आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अभिमानाचा ठराव मांडला. शिवसैनिकांनी उभं राहून मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं अभिनंदन केले.
शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी झाला असून, या माध्यमातून महाराष्ट्राच्या अस्मितेची मोठी चळवळ उभी राहिली. मी डॉक्टर नसलो, तरीही अजूनही ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. लांडग्याचं कातडं पांघरून वाघ होता येत नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर बोचरी टीका केली. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादीने आणि दुसऱ्यांदा काँग्रेसने फोडली होती, आता मात्र तुम्ही त्यांच्यासोबतच जाऊन बसला आहात. शिवसेनेचे 40 आमदार होते, एकनाथ शिंदेने 60 आमदार निवडून आणले आहेत. आमदार, खासदार, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती आहेत. चांदा ते बांदा शिवसेनामय करुन टाकण्याचं काम आपण केलं आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे बोलले की, ज्याला जायचं त्यांनी खुशालं जावं, असं ते म्हणतात.. जा-जा म्हणून आता सगळेच जाऊ लागले आहेत. याचं त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. आता त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक राहिलेले आहेत. अशाने कसा पक्ष वाढेल? तुम्हारे पांव के निचे जमीन नहीं, कमाल है की फिर भी तुम्ही यकिन नही.. अशी शेरेबाजी शिदेंनी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai