शेअर्स गुंतवणुकीत दिड कोटींचा गंडा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 03, 2026
- 18
नवी मुंबई : शेअर्स गुंतवणुकीवर आणि ब्लॉक ट्रेडिंगवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सायबर टोळीने वाशीतील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 1 कोटी 45 लाख 94 हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
गत 2 एप्रिल रोजी तक्रारदाराच्या व्हॉट्सऍपवर सायबर टोळीतील मनीषा शहा नावाच्या महिलेने संपर्क साधुन त्यांना लक्ष्मी कॅपीटल व्हिआयपी नावाच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास सांगितले. यासाठी सुरुवातीला 16 हजार रुपये भरल्यानंतर त्यांना या ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपचा अडमीन आरोपी सुमित शर्मा याने सदर ग्रुपमध्ये शेअर्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने अधिकृत वाटेल अशा एका बनावट वेबसाईटची लिंक पाठवून त्यावर तक्रारदाराची वैयक्तिक माहिती भरुन रजिस्ट्रेशन करुन घेतले. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या टिप्स नुसार तक्रारदाराने शेअर्स खरेदी, आयपीओ खरेदी, ब्रोकरेज आणि टॅक्स भरणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सुमित शर्माने सांगितलेल्या सेबी रजिस्टर्ड भासवलेल्या विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास सुरुवात केली. तक्रारदाराने 2 एप्रिल ते 3 जून या कालावधीत एकूण 27 वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे तब्बल 1 कोटी 45 लाख 94 हजार रुपये आरोपींच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर सायबर टोळीकडुन तक्रारदाराला गुंतवणूकीवर झालेला मोठा नफा एका विशिष्ट लिंकवर आभासी स्वरुपात दाखविण्यात येत होता. त्यामुळे 4 जून रोजी तक्रारदाराने आपला झालेला नफा आणि गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, सदर लिंक पूर्णपणे बंद झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी व्हॉट्सऍपवर मनीषा शहा हिच्याशी वारंवार संपर्क साधला असता, तिने आधी तांत्रिक टीम काम करत आहे अशी थातुरमातूर उत्तरे दिली आणि नंतर आपला मोबाईल नंबर बंद करुन टाकला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सुरुवातीला राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि त्यानंतर नवी मुंबई सायबर पोलिसात धाव घेतली.
नवी मुंबई सायबर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात सायबर चोरटांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या गुह्यातील आरोपींचा आणि फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये जमा झाली, त्या खातेदारांचा शोध सुरु केला आहे. नागरिकांनी व्हॉट्सऍप किंवा टेलिग्राम ग्रुप वरून मिळणाऱया शेअर्स ट्रेडिंगच्या आणि अधिक नफा देण्याच्या टिफ्सवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. कोणत्याही अनधिकृत किंवा अनोळखी लिंकवर आपली वैयक्तिक व आर्थिक माहिती शेअर करु नये. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai