....तर भूमिपुत्रांची अनधिकृत बांधकामे नियमित करु
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 10, 2026
- 15
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्रांनी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत मागणी केल्यास त्यांची सुनावणी घेऊन नियमानुसार निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना अनधिकृत बांधकामांबाबत नोटिसा बजावण्या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना त्या बोलत होत्या. ही लक्षवेधी सूचना सदस्य मंदा म्हात्रे यांनी मांडली होती. यावेळी सदस्य योगेश सागर यांनीही चर्चेत सहभाग घेतला. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार नवी मुंबई महापालिकेला चार महिन्यांच्या आत संपूर्ण कार्यक्षेत्राचे सर्वेक्षण करून अनधिकृत बांधकामे निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित बांधकामधारक किंवा व्याप्तीधारकांना नोटीस बजावून त्यांना सुनावणीची संधी दिल्यानंतरच निष्कासनाची कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार महापालिकेकडून कार्यवाही सुरू आहे. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, स्थानिक भूमिपुत्रांनी अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची मागणी केल्यास त्यांची सुनावणी घेण्यात येईल. संबंधित प्रकरणांची नियमानुसार तपासणी करून पात्र बांधकामांच्या नियमितीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल. भूमिपुत्रांना न्याय मिळावा, या दृष्टीने शासन सकारात्मक भूमिका घेऊन कार्यवाही करणार आहे.
सर्वेक्षणामध्ये आढळलेल्या 12 हजार 687 अनधिकृत बांधकामधारकांना सुनावणीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत 2 हजार 362 सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांमार्फत आठवड्यात तीन दिवस सुमारे 150 सुनावण्या घेण्यात येणार असून, नियमितीकरणासाठी पात्र ठरणारी बांधकामे नियमानुसार नियमित करण्यात येतील, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai