जलतरणपटू अंशुमनचा जागतिक विक्रम
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 10, 2026
- 18
3 वर्षांत ओशन्स सेव्हनमधील सात सामुद्रधुनी पार
नवी मुंबई : नवी मुंबईच्या 21 वर्षीय अंशुमन झिंगरन याने जपानमधील अत्यंत आव्हानात्मक त्सुगारु सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार करत जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे ओशन्स सेव्हनचे आव्हान पूर्ण केले आहे. या कामगिरीमुळे तो जगातील सर्वात कमी वयात ओशन्स सेव्हन पूर्ण करणारा पुरुष जलतरणपटू ठरला असून, सदर कामगिरी करणारा भारतातील केवळ तिसरा जलतरणपटू बनला आहे.
30 जून 2026 रोजी अंशुमनने जपानमधील गोंगेनझाकी ते फुकुशिमा दरम्यानची 19.5 किलोमीटरची त्सुगारु सामुद्रधुनी 12 तास 39 मिनिटे 29 सेकंदांत पार केली. या पराक्रमाला त्सुगारु स्ट्रेट स्विमिंग फेडरेशनची अधिकृत मान्यता मिळाली असून, त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स कडे पाठविण्यात आली आहे. यापूर्वी सदर विक्रम नवी मुंबईच्याच प्रभात कोळी यांच्या नावावर होता. त्यांनी वयाच्या 23 व्या वर्षी ओशन्स सेव्हन पूर्ण केले होते.
अंशुमनने अवघ्या 3 वर्षांत ओशन्स सेव्हनमधील सर्व सात सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केल्या. 17 जुलै 2023 रोजी उत्तर आयर्लंड ते स्कॉटलंडदरम्यानचा नॉर्थ चॅनल 11 तास 28 मिनि3त पार करून त्याने या जलमार्गावर सर्वात कमी वयात यश मिळविण्याचा जागतिक विक्रम केला होता. त्यानंतर अमेरिकेतील कॅटालिना चॅनल, न्यूझीलंडचा कुक स्ट्रेट, हवाईतील मोलोकाई चॅनल, स्पेन-मोरोक्कोदरम्यानची जिब्राल्टर सामुद्रधुनी, इंग्लिश चॅनल आणि अखेर जपानमधील त्सुगारु चॅनल पार करत त्याने ओशन्स सेव्हनचे स्वप्न पूर्ण केले. नवी मुंबईचा रहिवासी असलेला अंशुमन वाशी येथील फादर ॲग्नेल स्पोर्ट्स सेंटरमध्ये छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक गोकुळ कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. महाराष्ट्र किनारपट्टीवरील दीर्घ पल्ल्याच्या सरावासह बर्फासारख्या थंड पाण्याची सवय व्हावी यासाठी त्याने विशेष प्रशिक्षण घेतले. धरमतर आणि रेवस ते गेटवे ऑफ इंडिया अशा लांब पल्ल्याच्या समुद्री सरावाने त्याच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. अंशुमनच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे नवी मुंबईसह संपूर्ण देशाची मान उंचावली असून, भारतीय खुल्या समुद्रातील जलतरण क्षेत्रासाठी सदर अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai