पनवेलच्या अवयवदान दिंडीचा महाराष्ट्रभर जागर
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 22
पनवेल ः आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात ‘अवयवदान हीच खरी जीवनदानाची वारी’ हा मानवतेचा संदेश घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या पनवेल महापालिका व धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशियो-हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन (दोस्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयवदान व आरोग्य सेवा दिंडीला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, समाजात अवयवदानाविषयी जनजागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही दिंडी करत आहे.
पंढरीच्या वारीसोबत मानवतेचा संदेश घेऊन पुढे सरकणाऱ्या या दिंडीद्वारे ‘अवयवदान हेच श्रेष्ठ जीवनदान’ हा संदेश हजारो वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. दिंडी ज्या-ज्या गावांतून मार्गक्रमण करत आहे, त्या प्रत्येक ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून अवयवदानाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सध्या ही दिंडी इंदापूर येथे पोहोचली असून, हजारो वारकरी, नागरिक आणि स्थानिक सामाजिक संस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. अवयवदानाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच अवयवदानाचा संकल्प करण्यासाठी वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. दिंडीच्या माध्यमातून आरोग्य जनजागृती, मानवतेचा संदेश आणि समाजहिताची भावना प्रभावीपणे पोहोचत असल्याने सर्व स्तरांतून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या प्रसंगी पनवेल महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी इंदापूर येथे दिंडीला भेट देऊन सहभागी वारकरी, स्वयंसेवक आणि आयोजकांशी संवाद साधला. त्यांनी दिंडीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अवयवदान जनजागृती अभियानाबाबत टीमचे कौतुक करत हा उपक्रम समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. दररोज हजारो वारकऱ्यांच्या संपर्कात येत असलेली ही दिंडी अवयवदानासारख्या संवेदनशील विषयाला लोकचळवळीचे स्वरूप देत आहे. वारीच्या अध्यात्मिक वातावरणातून “मृत्यूनंतरही जीवनदान“ हा संदेश प्रभावीपणे जनमानसापर्यंत पोहोचत असून, अनेक वारकरी व नागरिक अवयवदानाविषयी सकारात्मक भूमिका व्यक्त करत आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या या अभिनव उपक्रमाची राज्यभर चर्चा होत असून, विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांकडून या अभियानाचे विशेष कौतुक केले जात आहे. अवयवदान जनजागृतीचा संदेश पंढरीच्या वाटेवरून प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा पनवेल महानगरपालिकेचा हा उपक्रम सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.
- वारकऱ्यांसाठी 14 ठिकाणी आरोग्य सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले त्यातुन 6984 जणांना औषधी वाटप करून आरोग्यसेवा दिली .
- वारकऱ्यांसाठी 6 ठिकाणी चरण सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले त्यातुन 790 जणांना चरणसेवेचा लाभ देण्यात आला तसेच, विविध दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी तेलाचे वाटप करण्यात आले.
- अवयवदान विषयक माहिती पत्रक सर्वच ठिकाणी वाटण्यात आले 8000 माहिती पत्रांचे वाटप करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai