बनावट कॉल सेंटरवर छापा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 18
88.21 लाखांची फसवणुक; 111 तक्रारी प्राप्त
नवी मुंबई ः ऑनलाइन विमा विक्रीचे प्रलोभन देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या महापे येथील बनावट कॉल सेंटरवर नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यात तब्बल 88.21 लाख रुपयांच्या फसवणुकीचा पर्दाफाश केला. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे प्राप्त झालेल्या 111 तक्रारींमुळे या रॅकेटचा माग काढण्यात यश आले.
ऑनलाइन विमा देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे स्वीकारून प्रत्यक्षात कोणताही विमा न देता फसवणूक केली जात होती. या गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या आठ मोबाइल क्रमांकांविरोधात देशभरातून 111 तक्रारी महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. तांत्रिक तपासात हे क्रमांक नवी मुंबईत सक्रिय असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही माहिती आर्थिक गुन्हे शाखेला दिली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 26 मोबाइल, 5 लॅपटॉप आणि 27 हार्डडिस्क जप्त केल्या. डिजिटल पुराव्यांच्या तपासणीत एप्रिल 2025 पासून हे कॉलसेंटर सुरू असल्याचे समोर आले. आतापर्यंत 88 लाख 21 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून, गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्यांमध्ये 14 लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. सायबर पोलिस या रॅकेटची व्याप्ती, इतर राज्यांतील संभाव्य बळी आणि आर्थिक व्यवहारांचा तपास करीत असून, फसवणुकीची रक्कम आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तपासादरम्यान महापे येथील टेक्नोसिटी पार्कमधील कॉलसेंटरचा शोध लागला. गुरुवारी टाकलेल्या छाप्यात तेथे 10 युवक आणि 21 युवती काम करताना आढळल्या. प्राथमिक चौकशीत हे कॉलसेंटर शालिनी सय्यद आणि शकील सय्यद हे दाम्पत्य चालवत असल्याचे, तर प्रसाद तोडणकर, वैभव इंगळे आणि फैयाज नासीर हे दैनंदिन कामकाज सांभाळत असल्याचे उघड झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai