महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 19
नवी मुंबई : वीज जोडणीसाठी आवश्यक असणारा फिजिबिलिटी रिपोर्ट देण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारणाऱया तळोजा येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले. रोहित रेवानंद मोरे (32) असे या लाचखोर अधिकाऱयाचे नाव असून त्याच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांच्या पी.एन. इलेक्ट्रीकल्स कंपनीच्या कामाचा फिजिबिलिटी रिपोर्ट मंजूर करुन देण्यासाठी महावितरणच्या तळोजा येथील सहाय्यक अभियंता रोहित मोरे याने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने गत 13 जुलै रोजी नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरोकडे (एसीबी) तक्रार दाखल केली होती. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली असता, सहाय्यक अभियंता रोहित मोरे याने फिजिबिलिटी रिपोर्ट देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नवी मुंबई एसीबीचे पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी तळोजा येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा लावला होता. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास सहाय्यक अभियंता रोहित मोरे याने तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याच्या विरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai