विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ठाकरे बंधूचा मुंबईत मोर्चा
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 25, 2026
- 28
26 जुलैला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत
मुंबई ः नीट परीक्षेत झालेल्या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने राजधानी दिल्लीत सुरू केलेलं आंदोलन आता तीव्र झाले आहे. तसेच या आंदोललाना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंनीही या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ एल्गार पुकारला आहे. तसेच रविवारी 26 जुलै रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांसह मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली आहे. या मोर्चाची माहिती देताना राज ठाकरे यांनी सांगितले की,सध्या विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक आपला राग, रोष व्यक्त करताहेत आणि तो केंद्र सरकारला कळणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही रविवारी 26 जुलै रोजी मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा शिवाजी पार्क येथून निघेल आणि सिद्धिविनायक मंदिर येथे समाप्त होईल. तिथे जाऊन आम्ही या सरकारला सुबुद्धी देवो, असं साकडं सिद्धिविनायकाला घालणार आहोत. तर उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चाबाबत म्हणाले की, कालच दिल्लीला जाऊन आलो. माझ्या आधी अमित पण जाऊन आला. आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहतंय. एक गोष्ट नक्की आहे की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही आहे. कारण ज्या वेळेला मी जंतर मंतरवर गेलो तेव्हा तिथे माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही मंडळी होती. त्यावेळी तिथे असलेल्या गर्दीमध्ये आम्हाला अशी एक व्यक्ती भेटली जी विद्यार्थी वाटत नव्हती. तर तो मध्यमवयीन तरुण होता. त्यावेळी त्याला तुम्ही इथे का आलात असे विचारले असता त्याने नोटाबंदीमध्ये आपला व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे आणि त्याचा राग व्यक्त करण्यासाठी आपण इथे आल्याचे सांगितले. म्हणजेच विद्यार्थ्यांचं आंदोलन हे केवळ निमित्त आहे. तर गेल्या काही वर्षातील लोकांच्या मनात असलेला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai