पं. प्रकाश संगीत यांच्या गायनाची पर्वणी
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 01, 2026
- 28
2 ऑगस्ट रोजी वाशीत गुरुपौर्णिमा उत्सव
नवी मुंबई : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गायनाचार्य पंडित डॉ. प्रकाश संगीत यांच्या शिष्यांनी येत्या 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम वाशी सेक्टर-30 येथील भारतीय विद्याभवन केंद्राच्या सभागृहात होणार आहे. नवी मुंबईतील संगीतप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणाऱ्या या गुरुपौर्णिमा उत्सवाचे यंदाचे 21 वे वर्ष आहे. आपल्या गुरु प्रती आदरभाव व्यक्त करणे आणि शास्त्रीय संगीताचा प्रसार करणे हा या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश असल्याचे कांचन संगीत यांनी सांगितले.
या विशेष सोहळ्यात संगीताच्या विविध छटांचा अनुभव रसिकांना अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायन विभागात धैर्वी मेहता, ऋशिता झा, उमा अमीन, अनुराग नाईक, डॉ. चैतन्य संगीत यांच्यासह स्वत गायनाचार्य पंडित डॉ. प्रकाश संगीत आपली कला सादर करणार आहेत. यावेळी राजलक्ष्मी संगीत यांचे सतार वादन हे या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण असणार आहे.
यावेळी संवादीनीवर (हार्मोनियम) प्रकाश चिटणीस तर तबल्यावर रामदास म्हात्रे हे साथसंगत करणार असून निवेदन कांचन प्रकाश संगीत या करणार आहेत. या संगीत महोत्सवाचा आणि गुरुवंदनाचा लाभ घेण्यासाठी संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक नंदिनी नारायणी यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai