अतिधोकादायक इमारतींची नळजोडणी खंडित
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 06, 2026
- 22
नवी मुंबई ः नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सी 1 प्रवर्गातील अतिधोकादायक इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तेथील रहिवास थांबावा याकरिता त्या इमारतींची नळ जोडणी व मलनिःसारण वाहिनी खंडित करण्यात आली.
महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये अतिधोकादायक सी 1 प्रवर्गातील इमारतींमध्ये पावसाळी कालावधीत कोणताही दुर्घटना घडू नये यादृष्टीने काळजी घेत या इमारतींमधील रहिवास थांबवावा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. मात्र अद्याप काही ठिकाणी रहिवास सुरु असल्याने तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळ जाण्यासाठी पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. बेलापूर विभागातील व्हाईट हाऊस को-ऑप हो सोसायटी लि, नेरुळ, शिवनेरी को. ऑप. हौ. सोसायटी लि.एन एल-5, नेरुळ, वाशी विभागातील लिटिल फ्लॉवर को. ऑप. हौ.सो. लि जेएन-4 टाईप (बिल्डिंग नं. 9) से.9 वाशी, नूर को ऑप हो सो लि, प्लॉट नं 18, सी 1 व सी 2 टाईप, वाशी, सुमंगल अपार्टमेट, वाशी, गगनगिरी को. ऑप हौ. सोसायटी लि, कोपरखैरणे, सिल्व्हर नेस्ट को.ऑप.हौ. सोसायटी.लि.,कोपरखैरणे, राज पॅलेस को.ऑप. हौ. सोसा. कोपरखैरणे या इमारतींची नळजोडणी व मलनिःसारण वाहिन्या खंडित करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता मदन वाघचौडे तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व त्यांच्या अधिनस्त असलेले अतिक्रमण विभागाचे अधिकारी-कर्मचारी त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता, उपअभियंता व सर्व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai