गणेशोत्सवापूर्वी रस्ते सुधारणेसाठी कालबध्द सुयोग्य नियोजन
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 22
नवी मुंबई ः शहरांच्या हद्दीत रस्त्यावर पडणारे खड्डे व येणाऱ्या गणेशोत्सव कालावधीत नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठकीत सर्व महानगरपालिकांना दिलेल्या सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अभियांत्रिकी विभागास सूचना निर्गमित केल्या असून त्यास अनुसरून महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचे विभागनिहाय पथक तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत रोड पेट्रोलींग ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरील सर्व खड्डे जिओ टॅग करण्यात यावेत आणि सर्वसाधारणपणे सदर खड्डे हे खडी व डांबर / खडी व रेती अथवा पेव्हर ब्लॉक्सने भरतात ते मास्टिक जिओपॉलिमर ने भरण्यात यावेत असे निर्देशित करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खड्डे असतील तर ते एम 60 - या तंत्रज्ञानाने भरण्यात यावेत आणि रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावेत असे सूचित करण्यात आले आहे. यासोबतच श्रीगणेशोत्सव काळात गणेश विर्सजनासाठी पुरेशा प्रमाणात कृत्रिम तलाव उपलब्ध करुन देण्यात यावेत व घाट रस्ता दुरूस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. आणि या माध्यमातून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून सुटका करण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे श्री गणेशोत्सवासाठी लगणाऱ्या विविध परवानग्या मिळविण्यासाठी एक खिडकी योजना अंमलात आणली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत असलेल्या पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनएचआय अशा इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांची दुरूस्ती संबंधित महानगरपालिकेने करून घ्यावी व खर्च संबंधित प्राधिकरणाकडून वसूल करण्यात यावा या उपमुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत.
याविषयीची कार्यवाही शहर अभियंता, उप आयुक्त (परि-1) व (परि-2), सर्व कार्यकारी अभियंता व सर्व विभाग अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात तात्काळ सुरू करावी तसेच महत्वाचे म्हणजे शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड व अति आयुक्त (2) डॉ.राहुल गेठे यांनी सर्व बाबींची क्षेत्रीय पाहणी करावी व येत्या गणेशात्सवात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही व सर्व सुविधा उपलब्ध होतील याची खात्री करण्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचेमार्फत निर्देश देण्यात आलेले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai