भीषण अपघात दोघांचा मृत्यू
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 22, 2026
- 27
नवी मुंबई ः ठाणे-बेलापूर मार्गावर पावणे एमआयडीसीजवळ बुधवारी संध्याकाळी एक भीषण अपघात घडला. एका भरधाव अज्ञात कारने स्कूटीला दिलेल्या जोरदार धडकेत जावई आणि सासऱ्याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता चालक वाहनासह पसार झाला असून तुर्भे पोलीस त्याचा तीव्र शोध घेत आहेत.
राज पंचम जैस्वार (वय, 42) आणि त्यांचे सासरे शिवमूरत रामलोचन जैस्वाल (वय 61, दोघेही रा. खैरणे गाव) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज जैस्वार हे आपल्या स्कूटीवरून सासरे शिवमूरत यांना मागे बसवून ठाण्याच्या दिशेने जात होते. बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पावणे एमआयडीसी येथील खैरणे पुलाखालील नाल्याजवळ त्यांच्या स्कूटीला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने धडक दिली. या धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी त्यांना तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.अज्ञात कारचालकाचा शोध सुरूअपघात घडल्यानंतर चालकाने थांबून जखमींना मदत करणे किंवा पोलिसांना कळवणे आवश्यक होते. मात्र, चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. सध्या पोलीस परिसरातील माहिती आणि पुराव्यांची पडताळणी करत असून पसार झालेल्या चालकाचा शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात हा अपघात अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे झाल्याचे स्पष्ट होते. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी निष्काळजीपणाने आणि अतिवेगाने वाहन चालवून मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुर्भे पोलीस करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai