शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 21, 2026
- 24
नवी मुंबई : शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या वतीने नवी मुंबई विद्यालय, वाशी येथील 90 विद्यार्थ्यांसाठी म्युझियम ऑफ सोल्युशन्स येथे शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी, तसेच त्यांच्या ज्ञानाला, जिज्ञासेला आणि सर्जनशीलतेला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना, उपक्रम आणि अनुभवाधारित शिक्षणाचा आनंद घेतला. प्रत्यक्ष निरीक्षण आणि कृतीतून शिकण्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे अधिक उत्सुकतेने पाहण्याची संधी मिळाली. या अनुभवातून विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले. वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच अनुभवाधारित संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका संगीता भोगले यांनी शीलक्ष्मी सोशल फाउंडेशनच्या फाऊंडर रजनी ताजणे यांचे विशेष आभार मानले. वंचित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या अधिकाधिक शैक्षणिक आणि अनुभवाधारित उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी फाउंडेशनकडून मिळणाऱ्या या सहकार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पाटील अर्जुन, बुधकर सचिन, साळुंखे विकास आणि सर्व स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि सहकार्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या योगदानामुळे हा शैक्षणिक दौरा यशस्वीपणे पार पडला.
शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन भविष्यातही विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, कौशल्य विकास, अनुभवाधारित शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित अधिक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. प्रत्येक मुलाला शिकण्याची, अनुभव घेण्याची, स्वप्न पाहण्याची आणि प्रगती करण्याची समान संधी मिळावी या उद्देशाने फाउंडेशनचे सामाजिक कार्य सुरू आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai