2 ऑक्टोबरला देशभरात युपीआय बंद
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 26, 2026
- 26
व्यापाऱ्यांचा नो यूपीआय डे, फक्त कॅश स्वीकारणार
मुंबई : केंद्र सरकारने यूपीआय व्यवहारांवर लागू केलेल्या नव्या शुल्काविरोधात देशभरातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणाऱ्या नव्या मर्चंट डिस्काउंट रेट च्या निषेधार्थ व्यापारी संघटनांनी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी, म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी नो यूपीआय डे पाळण्याचे मोठे आवाहन केले आहे.
फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडळ आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांसारख्या देशातील आघाडीच्या व्यापारी संघटनांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 2 ऑक्टोबर रोजी देशभरातील छोटे-मोठे व्यावसायिक, किरकोळ दुकानदार आणि पेट्रोल पंप चालक यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारणार नाहीत. त्यामुळे त्या दिवशी ग्राहकांना खरेदीसाठी रोख रक्कम किंवा क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर करावा लागणार आहे.
एमडीआर ही एक प्रकारची प्रोसेसिंग फी असते, जी डिजिटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या बँका आणि पेमेंट गेटवेद्वारे व्यापाऱ्यांकडून वसूल केली जाते. सरकार आणि एनपीसीआयच्या नव्या निर्णयानुसार, 15 ऑक्टोबर 2026 पासून 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पी2एम यूपीआय व्यवहारांवर 0.4 % एमडीआर शुल्क आकारले जाणार आहे.हे शुल्क कमाल 300 रुपयांपर्यंत सीमित ठेवण्यात आले आहे. म्हणजेच व्यवहार 1 लाख रुपयांचा असो वा 10 लाख रुपयांचा, व्यापाऱ्याला जास्तीत जास्त 300 रुपये शुल्क भरावे लागेल. किराणा, पेट्रोल-डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि धान्यांसारख्या व्यवसायांमध्ये आधीच नफ्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यात आता अतिरिक्त 0.40% शुल्क भरावे लागल्यास मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
या निर्णयाविरोधात 23 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर आणि मुझफ्फरपूर यांसारख्या शहरांमधील तब्बल 125 व्यापारी संघटनांनी प्रातिनिधिक स्वरूपात नो यूपीआय डे पाळला, ज्यामुळे तेथील 25 % व्यवहार प्रभावित झाले. इंदूर रिटेल गार्मेंट्स असोसिएशनने तर ‘15 ऑक्टोबरपूर्वी हा निर्णय मागे न घेतल्यास सर्व यूपीआय क्यूआर कोड मशीन्स पाण्यात फेकून देऊ’ असा इशाराच दिला आहे. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष रवींद्र मंगवे यांनीही या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन, ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ फेडरेशन आणि रिटेल ट्रेडर्स वेल्फेयर असोसिएशन यांसारख्या प्रमुख संघटना 2 ऑक्टोबरच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai