एमबीए प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यात सुरू
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 10, 2020
- 620
मुंबई : एमबीए, एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसर्या आठवड्यात सुरू करण्यात येईल. पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
सामंत म्हणाले, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएएच - एमबीए , एमएमएस - 2020 ही सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 14 व 15 मार्च 2020 रोजी घेण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल दिनांक 23 मे, 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एमएएच - एमबीए, एमएमएस - 2020 च्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नयेत. याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.
एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेच्या सुधारीत तारखा
दरम्यान, एमएचटी-सीईटी 2020 परीक्षेच्या सुधारीत तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या तारखा पुढीलं प्रमाणे आहेत. पीसीबी ग्रुप - 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9 ऑक्टोबर 2020 आणि पीसीएम ग्रुप - 12, 13, 14, 15, 16, 19, 20 ऑक्टोबर 2020
तसेच परीक्षेचे वेळापत्रक हे सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना या वेबसाईटवरुन डाऊनलोड करता येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसंदर्भातील ताज्या अपडेट आणि सूचना जाणून घेण्यासाठी ुुु.ारहरलशीं.ेीस या वेबसाईटला भेट देण्याचे आवाहन सेलकडून करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai