इम्पेरियल शाळेविरोधात आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 17, 2020
- 485
पनवेल : खारघरमधील इम्पेरियल शाळेने पालकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता, विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिकवणी बंद केल्याने, पालकांनी मंगळवारी शाळेच्या विरोधात आंदोलन पुकारले.
कोरोनामुळे शाळेने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे, असे आदेश शासनाने दिले आहे, तसेच ऑनलाइन शिक्षण देताना कोणत्याही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, अशी स्पष्ट सूचना असताना, खारघर सेक्टर 35 मधील इम्पेरियल शाळेने पालकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता, मासिक शुल्कचा भरणा न केल्यामुळे ऑनलाइन शिकवणी बंद केली आहे, तर शाळेने घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेची माहिती न दिल्यामुळे संतापलेल्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते अमर उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता शाळेच्या समोर आंदोलन केले आहे. जोपर्यंत शाळा व्यवस्थापन ऑनलाइन शिकवणी वर्ग सुरू करीत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली होती. आंदोलनात जवळपास दीडशे पालक सहभागी झाले होते. शाळा प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी शाळा मालक एन.एम. शेख यांच्याशी संपर्क साधून, येत्या लवकरच पालक आणि शाळा व्यवस्थापन यांची बैठक घेतले जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे पालकांनी आंदोलन मागे घेतल्याचे सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज शेख यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai