विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 05, 2026
- 20
पनवेल ः पनवेल पालिकेतील विरोधी पक्ष नेते अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी महापौर कार्यालयाकडे त्यांनी राजीनामा सादर केल्याने पनवेलच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोंकण विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी शेकापच्या वतीने उमेदवारी दाखल केली होती. मात्र ती उमेदवारी मागे घेतल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. यावेळीझालेल्या आरोपांमुळे त्यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हा आरोप वेदनादायक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, त्यांची राजकीय वाटचाल कोणत्याही पदासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नसून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहे. त्यामुळे प्रामाणिकतेवर संशय घेतला जात असताना विरोधी पक्षनेते पदावर राहणे योग्य नसल्याचे त्यांना वाटले. हा निर्णय कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून स्वाभिमानाचे रक्षण आणि जनतेसमोर भूमिका स्पष्ट करण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. पद येतात आणि जातात, पण माणसाची प्रतिमा, तत्त्वनिष्ठा आणि जनतेचा विश्वास हेच खरे भांडवल आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले. आपल्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि जनतेचे आभार मानून त्यांनी कोणतेही पद न घेता जनसेवा आणि पक्षाच्या विचारांसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. म्हात्रे यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. पनवेलचे महापौर नितीन पाटील यांनी म्हात्रे यांचा राजीनामा मंजूर केला असून पुढील प्रक्रियेसाठी राजीनामा लवकरच महासभेसमोर ठेवण्यात येईल, असे महापौर पाटील यांनी स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai