यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 16, 2020
- 589
अमरावती : महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना 3 महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावतीच्या राजापेठ परिसरात यशोमती यांची गाडी एका पोलीसाने आडवली होती. त्यामुळे संतप्त यशोमती ठाकूर आणि त्यांच्या दोन सहकार्यांनी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीसाला मारहाण केली होती. या प्रकरणी अमरावती न्यायालयाने तिघांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
त्यामुळे आता भाजपने यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी यशोमती ठाकूर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्या म्हणाल्या, ‘याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता एका महिलेमागे संपूर्ण भाजप लागणार. भाजप आणि आमच्यात विचारांची लढाई आहे. पण त्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी विचारांची लढाई आम्ही लढत राहणार.’
असं म्हणत माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हाला न्याय मिळणार असा विश्सास देखील त्यांनी याठिकाणी व्यक्त केला. दरम्यान, अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai