18 वर्षावरील दिव्यांगांकरिता 10 जूनला विशेष लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 08, 2021
- 532
नवी मुंबई ः महानगरपालिकेच्या कोणत्याही लसीकरण केंद्रावर रांग न लावता 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्ती कोव्हीड लसीकरणापासून वंचीत राहू नयेत याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार 10 जून 2021 रोजी 18 ते 44 वर्षावरील दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
10 जून रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत दिव्यांगांकरिता विशेष लसीकरण सत्रे माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय सेक्टर 15 नेरुळ, राजमाता जिजाऊ रुग्णालय सेक्टर 3 ऐरोली व इ.एस.आय.एस. रुग्णालय सेक्टर 5 वाशी अशा 3 ठिकाणी आयोजित करण्यात आली आहेत. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्याकरीता आयोजित करण्यात आलेल्या या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai