फ्लेमिंगो अभयारण्याच्या गस्तीसाठी 10 इलेक्ट्रिक बाईक्स
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2026
- 34
कांदळवन, पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणासाठी वन विभागाचा पर्यावरणपूरक उपक्रम
नवी मुंबई : ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील कांदळवन आणि किनारी पाणथळ क्षेत्राच्या संरक्षणासाठी वन विभागाला 10 इलेक्ट्रिक मोटारसायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुर्भे येथे या इलेक्ट्रिक बाईक्सना हिरवा झेंडा दाखवून त्यांचा वापर सुरू करण्यात आला.कांदळवन व किनारी पाणथळ क्षेत्रात गस्त, देखरेख आणि क्षेत्रीय निरीक्षणासाठी या इलेक्ट्रिक बाईक्सचा उपयोग करण्यात येणार आहे. पारंपरिक वाहनांच्या तुलनेत या बाईक्समुळे संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रात कमी आवाजात आणि शून्य टेलपाईप उत्सर्जनासह गस्त घालणे शक्य होणार आहे. त्यामुळे फ्लेमिंगो, इतर वन्यजीव आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी वन विभागाच्या क्षेत्रीय पथकांना अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे.
ठाणे खाडीतील फ्लेमिंगो तसेच कांदळवन परिसंस्थेचे नियमित निरीक्षण आणि पर्यावरणपूरक पद्धतीने संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. शासकीय यंत्रणा आणि संबंधित संस्थांच्या सहकार्याने पर्यावरण संरक्षणाला चालना देण्याच्या दृष्टीने हे सकारात्मक पाऊल मानले जात आहे.वन अधिकाऱ्यांसाठी संवाद कार्यशाळादरम्यान, तुर्भे येथे वरिष्ठ वनाधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावर कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रभावी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. वन विभाग आणि नागरिकांमधील संवाद अधिक सकारात्मक, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अटल बांबू समृद्धी योजना आणि राष्ट्रीय बांबू मिशन यांच्या माध्यमातून बांबू लागवडीला प्रोत्साहन देताना शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि बाजारपेठेशी जोडण्यावर भर देण्यात आला. बांबू लागवडीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून लागवडीचे डिजिटल पद्धतीने निरीक्षण, माहिती संकलन, वाढीचे मूल्यांकन आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
वन विभागातील कामकाजात अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि एकसमान कार्यपद्धती निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तकाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि शेतकरी जोडणीवर भरवनसंवर्धनासोबतच शेतकरी, स्थानिक नागरिक आणि वन विभाग यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्याची गरज कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बांबू लागवडीला प्रोत्साहन, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व बाजारपेठेशी जोडणी तसेच वन विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि एकसमान कार्यपद्धती यावर विशेष भर देण्यात आला.तुर्भे येथील कार्यक्रमाला वरिष्ठ वनाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संबंधित संस्थेचे जनरल मॅनेजर प्रतीक खत्री आणि ॲडमिन ऑफिसर मुकेश शुक्ला यांचीही उपस्थिती होती.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai