ऐरोलीत दोन सख्या बहिणींची आत्महत्या
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 03, 2021
- 1125
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 10 येथील सागर दर्शन सोसायटीमध्ये राहणार्या दोन सख्या बहिणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.
ऐरोली सेक्टर 10 येथील सागर दर्शन सोसायटी मधील बिल्डिंग नं बी-15, रूम नंबर 2:3 येथे अनेक वर्षापासून वास्तव करणार्या लक्ष्मी पंथारी (33) व स्नेहा पंथारी (31) या दोघींनी आत्महत्या केली आहे. यां दोघी बहिणी सुशिक्षित असून लहान मुलांचे क्लासेस घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होत्या. वडिलांचे आधीच निधन झाले असून दहा वर्षांपूर्वी त्यांची आईने सुद्धा आत्महत्या केली असल्याचे शेजार्यांनी माहिती दिली. दोन दिवस दरवाजा बंद असल्याने अचानक दुर्गंधी सुटल्याने आसपासच्या रहिवाश्यांनी दरवाजा ठोकला परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून शेजारच्या लोकांनी माजी नगरसेवक विजय चौगुले यांना याबाबत माहिती दिली. चौगुले यांनी घटनास्थळी खातरजमा केल्यावर पोलिसांना संपर्क साधला पोलिसांनी दरवाजा तोडल्यावर आतमध्ये दोन तरुणीचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai