सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 25, 2021
- 484
नवी मुंबई ः राज्यातील वीजग्राहकांची थकबाकीचा डोंगर दिवसांदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे, मुख्य कार्यालयातून 500 रुपयांपेक्षा जास्त वीजबिलाची थकबाकी असणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे कडक निर्देश सर्व परिमंडलांना देण्यात आले आहेत. ग्राहकांना वीजबिल भरण्यात सोयीसाठी तसेच वीजबिल वसुलीला चालना देण्यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवारी भांडूप परिमंडलातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील.
भांडूप परिमंडलात वीजबिलाची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरु आहे. याशिवाय, तात्पुरता खंडित केलेल्या वीज जोडणीची तपासणी केली जात आहे. यामध्ये अनधिकृतपणे वीज वापरत असलेल्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. म्हणून ही कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृतपणे वीजेचा वापर करावा व नियमितपणे आपले वीजबिल भरावे असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी ग्राहकांना केले आहे. तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी भांडूप परिमंडलातील सर्व वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी सुरु राहतील. ग्राहक महादवितरणच्या संकेतस्थळावर अथवा महावितरणच्या मोबाईल ऍप या ऑनलाईनच्या माध्यमातून घरबसल्या वीजबिल भरू शकतात असे त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai